डोनगांव : (प्रतिनिधी) तुम्हाला मुलगी पसंत असेल तर तिला पळवून आणायला मदत करेन, कधीही फोन करा’ असे बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांची जीभ छाटा आणि ५ लाख घेऊन जा अशी खळबळजनक घोषणा माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे.”ज्या महाराष्ट्रात शिवछत्रपतींचे विचार आहेत, ज्यांनी परस्त्रीला आपल्या मातेसमान समान समजले, अशा महाराष्ट्रात मराठ्यांच्या कुळात जन्मलेल्या आमदार राम कदम यांनी मुलीला पळवून आणायला मदत करेन असे जाहीर विधान करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांची जीभ छाटली पाहिजे आणि जो कुणी हे कार्य करेल त्याला आपल्याकडून पाच लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल” अशी घोषणा माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment