Thursday, September 6, 2018

माणुसकी हाच जगातील सर्वात मोठा धर्म : शास्त्री महाराज

सामाजिक एकोपा निर्माण करा : सलाऊद्दीन शेख
कोणताच धर्म वाईट नाही : आ.डॉ.खेडेकर 
शिवतीर्था कडून मातृतीर्था कडे सेवे साठी आलो : डॉ.दिलीप भुजबळ पाटील
सामाजिक ऐक्य परिषदेला उत्स्फू र्त प्रतिसाद 

      देऊळगावराजा : (अशरफ पटेल, सुषमा राऊत) 
      सांप्रदायिक सदभाव निर्माण करण्यासाठी प्रत्येकाचा सकारत्मक प्रतिसाद महत्वाचा आहे. माणुसकी हाच जगातील सर्वात मोठा धर्म असून समाजात माणुसकीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी प्रयत्नात राहा असे प्रतिपादन हिवरा आश्रमचे गजानन शास्त्री महाराज यांनी ऐक्य परिषदेत केले.
            दि.६ सप्टेंबर रोजी महात्मा फुले नगर भवन सभागृहात आयोजित सामाजिक ऐक्य परिषदेत प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीत भारतमातेची प्रतिमेचे पुजन करुन दिप प्रज्वलीत करण्यात आले. या परिषदेला प्रमुख अतिथी म्हणून हिवरा आश्रमचे गजानन शास्त्री महाराज, भिवंडी येथील पोलीस पब्लिक मोहल्ला कमिटीचे सदस्य सलाऊद्दीन शेख, अप्पर पोलिस अधिक्षक संदिप डोईफोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी भिमानंद नलावडे, उपविभागीय महसूल अधिकारी डॉ.विवेक काळे, नगराध्यक्षा सौ.सुनिता शिंदे, सिदंखेडराजा नगराध्यक्ष अ‍ॅड.नाझेर काझी, तहसीलदार दिपक बाजड, शेख लुकमान, पैठणकर महाराज, फादर जॉन, लखनसिंग टाक, यांची उपस्थिती होती. सौ.शिंदे आणि अ‍ॅड. काझी यांनी   आपल्या उद्बोधनातून सामाजिक एकतेचा संदेश दिला वाद न करता एकोप्याने राहिल्यानेच समृद्धी नांदते असे सांगितले. पुढे बोलतांना शास्त्री महाराज यांनी शिवचरित्र आणि महामानवांचे जिवंत दाखले देवून तरुणामध्ये जोश निर्माण करुन उपस्थितांचे मने जिंकली याप्रसंगी देऊळगावराजा ठाणेदार सारंग नवलकार, सिंदखेडराजा ठाणेदार बळीराम गिते, किंनगावराजा पोलिस स्टेश्नचे जर्नाधन शेवाळे, अंढेरा ठाणेदार विनायक कारेगांवकर पोलिस अधिकारी व कर्मचाºयांची तसेच सभेला शांतता समिती सदस्य, मतदार संघातील सर्व पक्षीय नेते, तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच, उपस्थिती मोठ्या संख्यने होती. प्रस्ताविक यांनी केले. संचालन अर्जुन आंधळे यांनी केले. कार्यक्रमात  सदभावना प्रतिज्ञा घेण्यात आली तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आले.
        

  प्रस्ताविक        
            शिवतीर्था कडून मातृतीर्था कडे सेवे साठी आलो
           आपल्याला न्याय दिलेला आहे, समानता दिली आहे, बंधुता दिलेली आहे. त्याच बरोबर श्रद्धा, विश्वास, उपसाना यांचे स्वातंत्र देखिल घटनेने बहाल केलेले आहे. येणारे गणेशोत्सव, मोहर्रम, दुर्गा उत्सव शांती सदभावनेने साजरे करा असे आवहान केले. तर मी शिवतिर्था पासून मातृतीर्था कडे सेवे साठी आलो आहे.       
   काश यह मुल्क मे एैसी फिजा चले, मंदिर जले रंज तो मुस्लमान को भी हो, 
   पामाल ना होजाए मस्जीद की आबरु, यह गम मंदिर के निगेबां को भी हो,   
                           डॉ.दिलीप भुजबळ पाटील, बुलडाणा जिल्हा पोलीस अधिक्षक
      

         सामाजिक एकोपा निर्माण करा...   
         सर्व एकत्र येवून सामाजिक सलोखा निर्माण करा, न हिंदू, न मुस्लिम, न सिख, न इसाई सर्व जन भाई चारेचा संदेश द्या हाच खरा धर्म आहे.

                      सलाऊद्दीन शेख, पोलीस पब्लिक मोहल्ला कमिटीचे सदस्य भिवंडी 
          कोणताच धर्म वाईट नाही...
         जगातील कोणताही धर्म वाईट नाही, समाजातील काही आडमुठ्या लोकांमुळे सामाजिक तेढ निर्माण होते, माणसाला कोणत्याही धर्मात न विभागता सामाजिक समतेसाठी प्रत्येकाने झटले पाहिजे.                                                     

                            डॉ.शशिकांत खेडेकर, सिंदखेडराजा विधानसभा
          सामाजिक एकतेचे संदेश    
          सभा गृहातील मंचावर पोलिस प्रशासनाकडून खरा सामाजिक एकतेचे संदेश देण्यासाठी सर्व धर्मियांचे प्रतिनिधी आपल्या पारंपारीक वेशभूषेत असल्याने जिल्हयातील एकतेची तसेच सामाजिक सलोखा निर्माण करणारी साकळी मुख्य आकर्षन येणाºया सण उत्सवा मध्ये तरुणांईच्या ह्दयाला स्पर्श करणारा हा संदेश नविन रुजु झालेले जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील यांनी दिला.                                                    

No comments:

Post a Comment