स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा, सोशल मिडीयावर साफसफाई करतांना फोटो सेशन
मर्जीतील ठेकेदारांना स्वच्छतेचा ठेका, नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष,
देऊळगावराजा : (प्रशांत पंडित)
शहरातील विविध प्रभागामध्ये बहुतांशी रस्ते चांगले तर काही रस्ते खराब अवस्थेत असल्याने ठिकठिकाणी कचºयाचे ढिगार दिसून येत आहे. नगर पालिके प्रशासनाकडून लाखो रुपयाचे ठेके शहर स्वच्छ करण्यासाठी देण्यात येते परंतु वेळेवर घंटागाडी नियमित येत नाही. त्यामुळे कचºयाच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागते. साचलेला कचरा अखेर त्यांना मोकळ्या जागेवर टाकावा लागतो. गटारीही पूर्ण व नियमित स्वच्छ होत नाही, असे या शहरातील नागरिकांचे मत आहे.
नगर पालिकेच्या प्रभाग रचनेतील प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच शहराची लोकसंख्या ३५ ते ४० हजाराचे जवळपास पोहचली आहे. त्यानूसार प्रभागाचा विस्तार होत आहे. शहरातील त्र्यबंक नगर, सिव्हील कॉलनी, भगवान बाबा नगर, कबाड पूरा, खडकपूरा, दुर्गापूरा, मानसिंगपूरा, जुना जालना रोड, तांबटकर गल्ली, आदर्श कॉलनी, व शहरातील अनेक भागाचा समावेश आहे. प्रभागांचा विस्तार वाढल्याने मोठा परिसर त्यात सामावलेला आहे. पूर्वीच्या असलेल्या प्रभागात नवीन भागाचा समावेश झालेला आहे. संपूर्ण प्रभागाचा विचार करताना प्रभागात प्रामुख्याने रस्त्यांची कामे थातूरमातूर करण्यात आली आहे. शहरात काही ठिकाणी रस्ते खराब अवस्थेत झालेली दिसून येतात. तसेच काही ठिकाणी लहान गल्ल्यांमधील रस्ते खराब झालेले आहे. त्यावर खड्डे पडले आहेत. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त शहर स्वच्छ सप्ताह साजरा करण्यात येते परंतु एका दिवसात हाता झाडू घेवून फोटो सेशन करुन सोशल मिडीयावर टाकतांना भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते दिसून येत आहे. तसेच शहरात काही ठिकाणी कचरा घेण्यासाठी घंटागाडी नियमित नसल्याने बºयाचदा कचरा बाहेर फेकावा लागत आहे. त्यामुळे कॉलनी भागातही कचरा उघड्यावर पडलेला दिसतो. तर नाल्याची स्वच्छताही नियमित करणे गरजेचे आहे. कचºयामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव या परिसरात लवकरच होतो. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. अनेक वर्षांपासून राहत असलेल्या नागरिकांना मूलभूत सुविधांअभावी त्रास सहन करावा लागत आहे. नगर पालिका प्रशासनाकडून लाखो रुपये खर्च करुन ठेके दिले जात आहे. परंतु आपसातील वादामुळे स्वच्छते प्रश्न एरणीवर आलेला आहे. अशी चर्चा शहरात सुरु आहे. या गंभीर समस्यांकडे नगरसेवकांनी लक्ष घालून त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे इतकीच माफक अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.


No comments:
Post a Comment