देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
दि.२२ सप्टेंबर रोजी आ. डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि अभ्यासिकेचे लोकार्पण साठी श्री बालाजी महाराजांची पुण्यनगरीत आले असतांना डॉ.सुनिल कायंदे यांच्या राहत्या घरी आ. डॉ. संजय कुटे यांचे सत्कार करण्यात आला. येणाºया लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमिवर मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदार संघातील विविध विषयांवर भाजपाचे उभरते युवा नेतृत्व डॉ.सुनिल कायंदे यांच्या निवास्थानी जळगाव जामोदचे आमदार डॉ.संजय कुटे यांच्या मध्ये चाय पे चर्चा करण्यात आली. त्यावेळी माजी आमदार तोताराम कायंदे तथा डॉ.सुनिल कायंदे मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.


No comments:
Post a Comment