देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
स्थानिक श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा एन.सी.सी. कॅडेट अजय सुनिल घुगे याची दिल्ली येथील एन.सी.सी. ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प, नवी दिल्लीसाठी निवड झाल्याने महाविद्यालयाच्या व खामगाव एन.सी.सी. बटालियनच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे.
रायफल शुटींग, मॅप रिडींग, ऑबस्टॅकल, फिल्ड सिग्नल, लाईन एरिया, हेल्थ अॅण्ड हायजीन, टेन्ट पिचिंग या विविध साहसी कसरती आणि लेखी परीक्षा अशा काठिण्यपूर्ण कसोट्यामधून कॅडेटस्ची दिल्ली येथील ऑल इंडिया थल सैनिक कॅम्पसाठी निवड केली जाते. अमरावती येथील राज्यस्तरीय कॅम्पमधील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे अजय घुगे या एन.सी.सी. कॅडेटची दिल्ली येथील ऑल इंडिया थल सेना कॅम्पसाठी महाराष्ट्राच्या 40 कॅडेट्सच्या चमू मध्ये निवड झाली आहे. यापूर्वी नवी दिल्ली येथील राजपथावर होणा-या रिपब्लिक डे परेडसाठी संपन्न झालेले कॅम्प आणि राष्ट्रीय खो-खो स्पर्धा अशा विविध इव्हेंटमध्ये सुध्दा महाविद्यालयाच्या सात कॅडेटस्नी यश संपादन करुन कलरकोट प्राप्त केले आहेत. महाविद्यालयाच्या सातत्यपूर्ण यशाची परंपरा कायम ठेवल्याने व बुलडाणा जिल्हयातील 13 महाराष्ट्र एनसीसी बटालियन खामगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याबद्दल अजयवर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे. जून 2018 पासून संपन्न झालेल्या 10 विविध कॅम्पमधून कॅडेट्सला आपले कौशल्य दाखवावे लागते. अतिशय खडतर परिस्थितीत संघर्ष करत परिश्रम, सातत्य आणि जिद्दीच्या बळावर अजयने हे यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाकरिता त्याला 13 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. खामगावचे कमांडिग ऑफीसर कर्नल आर. जयाकुमार, अॅडम. ऑफीसर एस.के. तिवारी, आरएम भूपेंद्रसिंग व एन.सी.सी. अधिकारी प्रा. डॉ. अनंत आवटी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. अजयच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, प्राचार्य डॉ. गजानन जाधव, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व एन.सी.सी. कॅडेटस् यांनी अजयचे अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी त्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:
Post a Comment