चिमुकलीचा नरबळी देणाºया नातेवाईकांचा केला पर्दाफाश
देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
यवतमाळ जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेला कार्यरत असताना पोलीस निरीक्षक सारंग नवलकार यांनी चिमुकल्या सपनाचा नरबळी देणाºया आजी, आजोबा व मामासह आठ आरोपींचा तातडीने छडा लावून सर्वांना गजाआड केले. उत्कृष्ट तपास केल्या बद्दल सारंग नलकार यांना पुणे येथे पोलिस महासंचालकांच्या हस्ते उत्कृष्ट तपास अर्वाड, रोख २५ हजार व प्रशस्ती पत्र देवून सन्मानित करण्यात आले.
स्थानिक देऊळगावराजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सारंग नवलकार हे यापूर्वी यवतमाळ गुन्हे शाखेत कार्यरत होते. त्या दरम्यान चोरंबा येथील सपना पळसकर या आठ वर्षीय मुलीचा दि.२४ आॅक्टोबर रोजी त्याच्या रक्ताच्या नातेवाईकांनी नरबळी देवून खून केला. त्या खूनाच्या तपास करणे हे पोलीसांसमोर एक आव्हान होते त्या आवहानास गोपनिय तपास करुन सारंग नवलकार यांनी मात्र सात ते आठ दिवसात कसून तपास करीत आरोपींना गजाआड केले. सारंग नवलकार यांच्या आवाहनात्मक यशस्वी तपासाची दखल पोलीस महासंचालकांनी घेतली आणि दि.२६ सप्टेंबर रोजी पूणे येथे पोलिस महासंचालकांच्या हस्ते उत्कृष्ट तपास अर्वाड, रोख २५ हजार व प्रशस्ती पत्र देवून सन्मानित करण्यात आले. त्याच्या कार्याला मातृतीर्थ परिवारा कडून मानाचा सलाम.....



No comments:
Post a Comment