Sunday, September 9, 2018

मातृतीर्थातील डॉ.कोमलने मिस इंडियाज परफेक्ट मॉडेल हा किताब पटकावला



देऊळगावराजा : (प्रतिनिधी) राष्ट्रीय स्तरावर झालेल्या परफेक्ट मॉडेल २०१८ या स्पर्धेत तालुक्यातील देऊळगावमही येथील एका डॉक्टर युवतीने विजेतेपद मिळवले आहे. तिच्या या यशामुळेच महाराष्ट्रासह बुलडाणा जिल्ह्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. संडे मॉडेल एंटरटेनमेंट या संस्थेद्वारे गोवा येथे मि. अ‍ॅण्ड मिस इंडिया परफेक्ट मॉडेल- २०१८ ही स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये डॉ. कोमल खिल्लारे हिने मिस इंडियाज परफेक्ट मॉडेल हा किताब पटकावला. 


          या स्पर्धेत देशभरातून मोठ्या संख्येने मॉडेल युवक-युवती सहभागी झाले होते.   स्पर्धेत मातृतीर्थातील पेशाने डॉक्टर असलेल्या तसेच सध्या वर्धा येथे मेडिकल आॅफिसर म्हणून कार्यरत कोमल मदन खिल्लारे, वय २४ वर्षे हिने सहभाग घेतला. या स्पर्धेत डॉ. कोमल हिने परीक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. देशभरातील अनेक मॉडेल्सना मागे टाकत डॉ. कोमल हिने मिस इंडियाज परफेक्ट मॉडेल हा किताब पटकावला. आपल्या यशाचे श्रेय कोमल ही आपल्या आई-वडील व मित्रांसमवेत तिचे कार्यक्रम दिग्दर्शक तारीक खान, फॅशन कोरिओग्राफर इम्रान शेख तथा सादिक कुरेशी यांचे आभार मानले आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणी डॉ. कोमल ही   तालुक्यातील देऊळगावमही येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणी आहे. जेथे मॉडेलिंग कोणताही गंध नाही. कोमल हिने आपल्या जिद्दीच्या आणि हुशारीच्या बळावर नुकतीच अकोला येथील मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी प्राप्त केली आहे. कोमलचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देऊळगावमही ते देऊळगावराजा प्रवास करत पूर्ण केलेले आहे. काहीतरी वेगळे करण्याच्या इच्छेने डॉ. कोमल हिने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करीत असतानाच मॉडेलिंगकडे वळली आणि तिने नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत हे घवघवीत यश संपादन केले. 

  

No comments:

Post a Comment