Thursday, October 4, 2018

डीग्रस रोड वरील जड वाहतूक बंद करा ग्रामस्थाची मागणी


 जड वाहुतकीमुळे डीग्रस रस्थाची होते चाळन !
देऊळगावमही - (राम परृहाड )   
       बुलडाणा जिल्हात रेती ची खान म्हणून डीग्रस गावाची ओळख खडकपूर्णा नदी ही गावाच्या जवळून गेली असल्यामुळे दरवर्षी या नदी वरील रेती घाट  लिलाव होत असतात मात्र संबंधित रेती व्यावसायिक प्रशासनाला न जुमानता रेती उपसा व वाहतुकी संदर्भातील सर्व नियम धाब्यावर बसवुन  मोठ्या प्रमाणात रेती उपसा होत आहे तर दुसरीकडे डिग्रस रस्थाची क्षमता नसतांनाही जड वाहतूक होत असल्यामुळे डीग्रस रस्थाची चाळन होत असुन जड वाहनाच्या  वातुकीमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे तसेच या वातूकीमुळे दिग्रस रस्थावरील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असुन या रस्थावरील जड वाहतुक बंद करावी   अंन्यथा डिग्रस रोड वरील नागरिकाच्या मागण्या मान्य न झाल्यास उपोषण छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे अवघ्या काही दिवसांवर नवरात्र उत्सव जवळ आला असुन या रोड वर माळावरची देवी असुन नवरात्र उत्सव काळात   या रोड नेहमीच गर्दी असते मात्र जड वाहतुकीमुळे होणारा धोका लक्षात घेऊन ही वाहतूक बंद करावी अशी मागणी होत आहे तसेच या रस्थाची क्षमता नसतांनाही जड वाहतूक होत असल्यामुळे डिग्रस रस्थाची चाळन झाली असुन संबंधित विभागाने या रस्थाची दुरुस्ती करून तात्काळ वाहने बंद करावी अशी मागणी डीग्रस ग्रामस्थ करत आहे

++++++++++++++++++++
ध्वनी व वायु प्रदूषनामुळे वाढले आजार 
रेती व्यावसायिक प्रशासणाला न जुमानता सर्व नियम धाब्यावर बसवून रात्र दिवस  अवैध रेती उपसा करत आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत असल्यामुळे  नागरिकांना उडणाऱ्या धुळ कणांमुळे तसेच ध्वनी प्रदूषनामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे तसेच डिग्रस हा रस्थावर मोठ्या प्रमाणात रहदारी असल्यामुळे जड वाहनामुळे नागरिकाच्या जिवीत्वास धोका निर्माण झाला असुन जड वाहने बंद करावी अशी मागणी नागरिक करत आहे
++++++++++++++++++
दिपक बाजड - तहसीलदार देऊळगावराजा 
रहदारीच्या रस्थाने वाहन चालविल्यास कारवाई करू 
जड वाहतुकीमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात रहदारी मार्गाने जाणारी वाहने बंद करू तसेच संबंधित ग्राम पंचायत प्रशासनाला पत्र देऊन वाहतूक बंद करण्यात येईल 
++++++++++++++++++
सुनील मोरे -ग्रामस्थ 
जड वाहने बंद करू अन्यथा उपोषण छेडु 
जड वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला असून धूळ कणांमुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे डीग्रस  रोड वरील जड वाहतूक बंद करा अन्यथा संबंधित विभागाच्या विरोधात उपोषण छेडण्यात येईल असा इशारा या वेळी देण्यात आला आहे.

2 comments:

  1. पैसा बोलतोय पैसा पैसा रूपया
    नोट चलती है. ..
    वाहने बातमी दिल्याने बंद होतील हा भ्रम. . .

    ReplyDelete
  2. This is currently working with raiti vahtuk band karo

    ReplyDelete