देऊळगाव राजा : (प्रतिनिधी)
तालुक्यातील गोंधनखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वय्वस्थाप समितीची नुकतीच निवड करण्यात आली. यामध्ये संदीप खरात यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
जिल्हा परिषद शाळेच्या सभागृहात व्यवस्थापन समिती निवडीसाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सरपंच भानुदास निकाळजे, खविसचे उपाध्यक्ष रविंद्र गीते, मुख्याध्यापक इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संदिप खरात यांची अध्यक्षपदी तर आनंदराव गीते यांची उपाध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली. तर समिती सदस्यांचीही याप्रसंगी निवड पार पडली. शाळेचे शिक्षक पालकांसह गावातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती. गोंधनखेड ग्रामस्थानी विशेष मागासवर्गीयांसाठी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी एकमाताने निवड करुन अगळा वेगळा संदेश दिला. भानुदास निकाळजे सरपंचपदी, महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी पुंजाराम खरात, तर नुकत्याच झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संदिप खरात यांची निवडीचे विशेष श्रेय खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष रविंद्र गीते आणि ग्रामस्थांना दिले जात आहे.


No comments:
Post a Comment