शेकडो युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
देऊळगावर मही. : (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी युवकांना नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. आजचा युवक हा राजकारणातला केंद्र बिंदु मानला आहे. त्यामुळे युवकांना नेतृत्व करण्याची संधी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच देऊ शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान शिंगणे यांनी केले.
देऊळगाव मही येथे पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्याला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. पुढे बोलताना शिंगणे म्हणाले की, युवकांनी स्वत: पुढे येऊन लढा देण्याची गरज आहे. मनात कोणतीही भीती न बाळगता हिमतीने संकटाचा सामना करण्यासाठी कंबर कसा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, जि. प. सदस्य, रियाज खान पठाण, भिकाजी शिंगणे, बाजार समितीचे सभापती नितीन शिंगणे, पं. स. सभापती कल्याणी शिंगणे, सिद्दीक कुरेशी, गजेंद्र शिंगणे, सुभाष शिंगणे, उपसरपंच रामकिसन म्हस्के, रतन रेशवाल, बाजार समितीचे संचालक मन्नान पठाण, सै.सईद, रविंद्र इंगळे, बळीराम शिंगणे, सुभाष शिंगणे, बबनराव खिल्लारे, अनंथा इंगळे, कृष्णा शिंगणे, भगवान शिंगणे, अशोक पाबळे, सुभाष इंगळे शे. मुन्तु, सै वाहेद, रघुनंदन वायाळ, भगवान चंद, संजय शिंगणे, बालु शिंगणे, रघु पाटील, नामदेव थोंबाळे, राजु शिंगणे, सै. वाहेद उपस्थित होते. संचालन आदिल पठाण यांनी केले


No comments:
Post a Comment