जिवनसाथी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
देऊळगावर मही. : (प्रतिनिधी)
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त काल दि. २ आॅक्टोबरला जिवनसाथी फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रेरणादायी संदेशाला उजाळा देत जिथे तिथे प्रेम आहे तिथे जिवन आहे, महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री या महापुरुषांचे विचार आत्मसात करुण आपल्या परिसरात जे मनोरुग्ण स्वच्छता व आरोग्याची कुठली ही काळजी घेत नाही अशा मनोरुग्णाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. गावातील मनोरुग्ण रविंद्र चे आरोग्य निरोगी राहावे म्हणून महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त रविंद्रला स्वच्छ आंघोळ घालून दाढ़ी,कटिंग करुण त्याला नवीन ड्रेस,पायातील चप्पल, डोक्यात टोपी घेऊन दिली.रविंद्र ने ड्रेस परिधान करताच अक्षरशा त्याच्या चेहºयावर हास्य फुलले होते.
तुझा आणि माझा रे नाही भरवसा, गर्व कशाला रे भल्या माणसा
हे दोन ओळीला ध्यानात व मनात ठेऊन नेहमी आपल्या सामाजिक कायार्मुळे चर्चेत व अग्रेसर असणाºया जिवनसाथी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रमामुळे व रविंद्रच्या चेहºयावरील आनंद पाहुन काहींचे ह्रदय सुद्धा भरावून गेले होते. सध्या हिवाळा समोर असून आपल्या आजूबाजूला असे कोणी मनोरुग्ण असतील तर त्यांना सुद्धा आपल्या घरातील निरुपयोगी कपडे, उरलेले जेवण व शक्य ते गोष्टी करून आनंदी व्हा व अशा लोकांना सदैव मदत करा असे आव्हान देखील जिवनसाथी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी विश्वस्त जनार्धन टेकाळे, डॉ महेश दंदाले, पत्रकार सुनील मतकर, संतोष जाधव, भगवान इंगळे, संजय कोठारी, संजय माऊली शिंगणे, शिवाजी शिंगणे, रवींद्र कुलकर्णी, शेख उस्मान, अमोल बोबडे, संतोष शिंगणे, दत्तू शिंगणे सैय्यद वाहेदअली यांच्यासह अन्य उपस्थित होते.


No comments:
Post a Comment