Tuesday, October 2, 2018

काळ्या फिती बांधून मौन व्रत


देऊळगावराजा : (प्रतिनिधी) 
      केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाच्या विरोधात दि.२ आॅक्टोबर रोजी अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मौन व्रत आंदोलन करण्यात आले. 
      मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदार संघात सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत हे आंदोलन करण्यात आले. सुरुवातीला महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांनी मौन व्रताला सुरुवात केली. केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या धोरणांमुळे देशातील जनतेची आर्थिक, सामाजिक परिस्थिती खालावलेली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. डिझेल, पेट्रोल, गॅस यांच्यावर प्रचंड प्रमाणात लादलेल्या करामुळे सर्व सामान्य जनतेची लूट होत आहे. तर दुसरीकडे देशाचा पोशिंदा शेतकरी राजाला सरकारकडून वाºयावर सोडण्यात आलेले आहे. देशातील काही उद्योगपतींना फायदा पोहोचवण्यासाठी शेतकºयांना शासनाकडून लुटल्या जात आहे. भाजप सेनेच्या प्रतिगामी धोरणामुळे महात्मा गांधीजींनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य, लोकशाही धोक्यात आली आहे. या सर्व बाबींचा विरोध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधीजींनी दिलेल्या अहिंसेच्या मागार्चा वापर करून मौन व्रत आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर जाधव, विधानसभाध्यक्ष गजानन पवार, सभापती नितीन शिंगणे, तालुका कार्यध्यक्ष सदाशिव मुंडे, दिलीपकुमार झोटे यांचेसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
     
 

No comments:

Post a Comment