Tuesday, October 2, 2018

कुपोषणावर मात करणाºया उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांचा सत्कार


ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली कामाची प्रशंसा 
देऊळगावर मही : (गजानन चोपडे) 
       जिल्हयातील सरंबा येथील सध्या हिंगोली येथे कार्यरत असलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी कुपोषण मुक्तीसाठी पुढाकार घेत चारशे मुलांपैकी १८३ मुले कुपोषण मुक्ती साठी पुढाकार घेतला आहे. या कायार्ची दखल घेवून गांधी जयंती निमित्त त्यांचा विशेष मुंबई येथे महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने सन्मान करण्यात आला आहे. 
         राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने कुपोषण मुक्ती साठी मोहीम राबवण्यात आली आणि तिची जबाबदारी ही उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांच्याकडे सोपवण्यात आली. यामध्ये चारशे कुपोषित बालके असणाºयाची काळजी कशी घ्यावी, त्यांचे कुपोषण कसे कमी करता येईल, बालमृत्यू कसा रोखता येईल, यासाठी गणेश वाघ यांनी वाड्या वस्तीवर जाऊन बालके कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी आहार व औषधोपचार केले. चारशे बालकांपैकी १८३ बालके कुपोषण मुक्त झाली आहेत. त्याचबरोबर त्या बालकांना स्वच्छता कशी ठेवायची यांची माहिती महिलांना देण्यात आली. गणेश वाघ यांच्या या कायार्ची दखल महिला व बालकल्याण विभागाने घेतली असून महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबई येथे ग्रामविकास तथा महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी अंगणवाडी सेविका मंगला भिसे, विस्तार अधिकारी अनिल केदार, ढोकणे, धापसे यांचा ही सत्कार करण्यात आला. 
  

No comments:

Post a Comment