देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
श्री बालाजी महाराजांच्या पुण्य नगरीतील सामाजिक कार्यकर्ते युवा पुरस्कार प्राप्त चंद्रकांत खरात यांच्या उत्कृष्ट कायार्ची दखल घेऊन कोल्हापुर येथील भारतीय अधिकार चे मुख्य संपादक शौकत नायकवडी यांच्या वतीने दि. ३० सप्टेंबर रोजी भारतीय माहीती अधिकार समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
खरात यांनी बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात अनेक शासकीय व निमशासकीय, सहकार खात्यात सूरु असलेल्या अनागोंदी कारभार माहीती अधिकार कायद्याच्या साहयाने उघड केला आहे. ज्या कार्यालयात गरजवंत लाभर्थ्यांची पिळवनुक होत असे अश्या असंख्य योजनाचा लाभ माहिती अधिकार कायद्याचा वापर करुण गरजु लाभर्थ्यांना न्याय मिळवून देण्यास मदत केलेली आहे.खरात यांना मिळालेल्या पुरस्काराने सर्वत्र अभिनदंन होत आहे.


No comments:
Post a Comment