Monday, November 12, 2018

देऊळगावमही मंडळ दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा 

राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने दिला जण आदोलनाचा इशारा
देऊळगावमही - (प्रतिनिधी)
        सततची दुष्काळ जन्य परिस्थिती , कर्जाचा डोंगर , भीषण पाणी टंचाई सामना , तसेच  निसर्गाच्या लहरीपणामुळे या वर्षी  खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यामुळे या वर्षी  देऊळगावराजा तालुक्यासह सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती बळीराजा वर  ओढवली आहे मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी देऊळगावराजा तालुका हा दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आला मात्र संबंधित लोकप्रतिनिधी तसेच विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी वारंवार शासनाकडे मागणी करून हा तालुका दुष्काळग्रस्थ यादीत घेण्यात आला मात्र या तालुक्यात एकूण पाच महसूल मंडळापैकी देऊळगावमही महसूल मंडळ दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आल्याने हे शासन  शेतकऱ्यांची थट्टा व चेष्टा करत असल्याचा आरोप समस्त शेतकरी बांधवांनी केला आहे . 
       सॅटेलाइट द्वारे केलेला सर्व्हे व शासनाचे निकशामुळे हे मंडळ दुष्काळग्रस्थ यादीतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा करून तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार हे सरकार  करत आहे . शेतकऱ्यांचे हित तसेच दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने सोमवार रोजी तहसीलदार दीपक बाजड यांना निवेदन देण्यात आले तसेच या निवेदनात म्हटले आहे की  देऊळगावमही महसूल मंडळ दुष्काळग्रस्त यादीत घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला .या वेळी राष्ट्रवादी जिल्हा युवक कार्याध्यक्ष समाधान भिकाजी शिंगणे ,पंचायत समिती सभापती नितीन शिंगणे , सिंदखेडराजा विधानसभा अध्यक्ष गजानन पवार , पंचायत समिती सदस्य हरीशमामा शेटे ,सरपंच सुभाष शिंगणे ,तालुका अध्यक्ष युवक गजानन चेके ,तालुका उपाध्यक्ष  रवींद्र इंगळे , रामकीसन म्हस्के , बळीराम शिंगणे , कृष्णा शिंगणे ,सुभाष शिंगणे ,उद्धव म्हस्के , आर आर बंगाळे , संतोष शिंगणे , संतोष शिंदे , निलेश शिंदे , अरविंद खाडेभराड , रघुनाथ शिंगणे , राजेंद्र झिने , गणेश आंधळे , संजय रिंढे , संजय शिंगणे , गजानन रायते , अमोल बोबडे , शिवहरी शिंगणे , एकनाथ शिंगणे , इत्यादी कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव या वेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment