Wednesday, November 7, 2018

देऊळगाव राजा व चिखली तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर


आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनानी दिली दिवाळी भेटं
 देऊळगाव राजा : (प्रतिनिधी) 
          यंदा पावसाने दांडी मारल्या मूळे हजारो हेक्टर क्षेत्रातील खरीप हंगामातील पिके पावसा अभावी  वाळून गेली तसेच गत काही काळापासून शेतकरी कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करत दरवर्षी अपेक्षा ठेऊन संघर्ष करीत आहे ऐन पीक बहरात असतानाच पावसाणे उघडीप दिल्याने तोंडाशी आलेला घास गमविण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.  राज्यसरकारने दुष्काळ 
                         

 ग्रस्त तालुक्याची यादी जाहीर केली होतीे. पण यामध्ये देऊळगाव राजा व चिखली तालुका वगळण्यात आला होता त्यामुळे देऊळगाव राजा व चिखली तालुका  दुष्काळ ग्रस्त घोषीत करावा, अशी मागणी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जालना येथे भेट घेऊन मागणी केली होती. त्यांच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी चर्चा करुन पुन्हा फेरविचार करुन दि.६ नोव्हेंबर रोजी सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांना देऊळगाव राजा व चिखली तालुका  दुष्काळ ग्रस्त जाहिर करुन दिवाळीची सुंदर भेट दिली.
  

        देऊळगाव राजा  व चिखली तालुक्यात खरीप हंगामात दमदार पावसाचे आगमन होऊ न शकल्याने सोयाबीन,मका, कपाशी  व अन्य पीकवाळून गेले आहे. पावसाचा खंड दोन महीने पेक्षा जास्त असून सोयाबीन,मका तसेच कापूस ही पिके पूर्णपणे वाळली आहे.अशा परिस्थितीत पावसाअभावी वाढत्या तापमानाने पिके धोक्यात आले आहे. पावसाअभावी हातातोंडाशी आलेले सोयाबीन व कपाशीचे पीक गमावण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. दिवाळी सारखा सण कसा साजरा करावा परिवाराचा उदरनिर्वाह करण्याची मोठी समस्या शेतकºयांपुढे उभी राहिली होती. तालुक्यातील खडकपूर्णा धरणा सह अन्य छोटे मोठे प्रकल्प कोरडे ठनठणीत तर काही ठिकाणी जलसाठा नगण्य अवस्थेत पोहचल्याने अनेक गावात पिण्याच्या व जनावरांना  पिण्याच्या पाण्यावर व परिसरातील सिंचन क्षेत्रावर विपरीत परिणाम जाणू लागला आहे. त्यामुळे सर्वत्र दुष्काळाचे गडद सावट कोसळलेली आहे. दमदार पाऊस न पडल्यामुळे खडकपुर्णा धरणात व इतर सिंचन प्रकल्पात पाहिजे तेवढे पाणी जमा होऊ शकले नाही. त्यामुळे खरीप हंगामातील सर्व पिके शेतकºयांच्या हातची गेली आहे. अशी भीषण परिस्थिती निर्माण झाल्याने सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी राज्य शासनाकडे पाठपूरावा करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिल्याने देऊळगाव राजा तालुका आणि चिखली तालुक्याची परिस्थिती पटवून दिली.  कारण दुष्काळग्र्सत यादीत नाव नसल्याल्याने तालुक्यातील शेतकºयांवर अन्याय असल्याचे आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी सांगितले. त्यांच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी चर्चा करुन पुन्हा फेरविचार करुन दि.६ नोव्हेंबर रोजी सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांना देऊळगाव राजा व चिखली तालुका दुष्काळ ग्रस्त जाहिर करुन दिवाळीची सुंदर भेट दिली.
                 
       शेतकºयांना न्याय देणारे आमदार शशिकांत दादा
       शेतकºयांच्या हितरसाठी नेहमी शासनाकडे पाठपुरावा करुन न्याय देण्यासाठी व मतदार संघाच्या विकासासाठी कटिब्ध असलेले सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी एका महिन्याच्या आत देऊळगावराजा आणि चिखली तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करुन खरी शेतकºयां सोबत दिवाळी साजरी केली.                                                                                  सतिष मोरे, जिल्हाध्यक्ष स्वभिमानी युवा आघाडी बुलडाणा जिल्हा      

No comments:

Post a Comment