जिल्हा परिषद शिक्षण विभाग बुलढाणा व जिल्हा विज्ञान शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ४४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन आज स्थानिक स्वामी विवेकानंद विद्यालय येथे देळगावराजा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सुनिता ताई शिंदे,जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे, पंचायत समिती सदस्या सौ रेणुका ताई बुरकुल, गजेंद्र शिंगणे, गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले, तालुका विज्ञान शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रामदास मुख्याध्यापक हरिदास भांबरगे,सुरेश चेके याच्या उपस्थितीत झाले. या प्रदर्शनीमध्ये विद्यार्थ्यांनी साकारलेली प्राथमिक गटातील १०९ व माध्यमिक गटातील ३६ अशी एकूण १४५ सादर झाली.
याप्रसंगी मनोगत करताना मनोज कायंदे यांनी विद्यार्थ्यांचे बाल मनातील व्यापक वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कौतुक केले तसेच गजेंद्र शिंगणे यांनी प्रत्येक बालकांमध्ये वैज्ञानिक लपला असून त्याच्या सुप्त गुणांना वाव देऊन शोधण्याचे काम विज्ञान प्रदर्शनी करीत असते असे सांगितले तर गटशिक्षणाधिकारी मुसद वाले यांनी प्राचीन भारतीय वैज्ञानिकांची कामगिरी सांगून करून गीता व ज्ञानेश्वरी यामध्ये उल्लेखित केलेला वैज्ञानिक दृष्टीकोन विशद केला. नागराध्याक्षा सौ सुनीताताई शिंदे या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की जेव्हा जेव्हा विज्ञान शाप की वरदान हा विषय समोर येतो तेव्हा विज्ञानाने मानवी जीवन किती सुकर केले आहे याची जाणीव होते तसेच शाप म्हणते वेळी मानवी विकृतीच त्यास कारणीभूत राहील असे म्हणावे लागेल . वैज्ञानिक दृष्टीकोन विद्यार्थीदशेतच विद्यार्थ्यांमध्ये रुजला जावा या उद्देशानेच विज्ञान प्रदर्शन आयोजन केले जाते असे रामदास गुरव यांनी प्रास्ताविकातून सांगितले, यावेळी सूत्रसंचालन उद्धव चेके यांनी केले तर आभार सुमित वाघमारे यांनी व्यक्त केले . यावेळी शिक्षण विस्ताराधिकारी चव्हाण केंद्रप्रमुख अशोक झीने, बबन कुमठे, कविता राठोड , रामेश्वर चित्ते, संजय मुंदनकर, गणेश कायंदे , भगवान थोरात , अ आरिफ , डी बी शिंगणे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment