देऊळगाव राजा : (प्रतिनिधी)
स्थानिक श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. अश्विनी अरूण साळवे हिने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये बी.ए. च्या राज्यशास्त्र विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करून विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पस्तीसाव्या दीक्षांत समारंभाचे प्रमुख अतिथी इस्त्रोचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन व विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते कु. अश्विनी साळवे हिला राज्यशास्त्र विषयातील सुवर्णपदक प्रदान करून तिचा गौरव करण्यात आला. यापूर्वीही कु. सरला डोईफोडे हया विद्यार्थिनीने राज्यशास्त्र विषयात सुवर्णपदक पटकावले आहे. यावर्षी प्राप्त झालेल्या या सुवर्णपदकासह महाविद्यालयाने आपल्या उत्कृष्ट निकालाची व यशाची परंपरा कायम राखली आहे. कु. अश्विनीच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिह जाधव, प्राचार्य डॉ. गजानन जाधव, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ अनंत आवटी तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे. कु. अश्विनी साळवे हिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडीलांसह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन जाधव आणि राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ अनंत आवटी यांना दिले आहे.


No comments:
Post a Comment