देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
दोन वर्षे गिट्टीखदानवर घाम गाळणाºया वडार समाजाच्या ४८ महिला व पुरुष मजुरांची मजुरी देण्यास खदान मालकाने टाळाटाळ केल्याने या कुटुंबीयांवर उपासमार ओढवली आहे. अरेरावी करणाºया खदान मालका विरोधात पोलिसांत तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने अखेर न्याय्य मागणीकरिता या कुटुंबीयांनी लहान मुलांसह बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बुधवारी दुसºया दिवशीही या उपोषणाची दखल घेण्यात आली नाही.
तालुक्यातील तुळजापूर शिवारात गिट्टी खदान आहे. या खदानीवर ४८ मजूर कामाला होते. मोठ्या मेहनतीने काम करूनही मालक पैसे देत नसल्याने मजुरांवर आर्थिक संकट कोसळले आहे. घामाचे दाम मिटविण्याकरिता खदान मालकाविरोधात तक्रार देण्यात आली. मात्र, काहीच कारवाई झाली नाही. तसेच जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊनसुद्धा गांभीयार्ने दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे मजुरांच्या कुटुंबीयांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात ४८ कुटुंबीय सहभागी झाले आहेत.
मजुरांची कोणतीच थकबाकी आज रोजी नाही
मी कोणताच धनादेश दिलेला नाही दिला असन तर कायदेशीर कारवाई करावी गिट्टीखदान माझा नासून माझ्यावर आरोप होत आहे. कोणतेच मजुरांची थकबाकी आज रोजी माझ्याकडे नाही उपोषण करुन मला मनसिक त्रास देण्याचा काम करीत आहेत.
रमेश काळवाघे, सेवानिवृत्त उपअभियंता सिंचन विभाग, देऊळगावराजा


No comments:
Post a Comment