सहकार नेत्यांच्या वचनाला सभापती व संचालक मंडळाकडून हूलकावनी
स्वहित जोपसण्यासाठी शेतकºयांना वेढीस
देऊळगावराजा : (अशरफ पटेल)
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत स्व.भास्करराव शिंगणे सहकार पॅनलच्या प्रचारचा शुभारंभ दि.१३ मार्च २०१५ रोजी आळंद फाट्यावर गणपती मंदीरा मध्ये माजी आरोग्यमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी नारळ फोडून खामगाव बाजार समिती पॅटन देऊळगावराजा बाजार समितीमध्ये येणाºया शेतकºयांना पशुधनाला चारा, पाणी आणि मोफत जेवन देण्याचा वचननाम्यात म्हटले होते. निवडणुक दरम्यान मतदारांनी नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसला भरघोस मतांनी नवीन संचालक मंडळ निवडून दिले तिन वर्ष उलटूनही आज पर्यंत कोणतीच सुविधी शेतकºयांना देण्यात आलेली नाही. तर प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आरोग्यमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिलेल्या वचननाम्याला खो दिसून येत आहे.
सिंदेखडराजा मतदार संघात गेले २० वर्ष माजी आरोग्यमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे वर्चस्व होते. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांना मतदार संघातील मतदारांनी निवडून दिले तरीही ते बाजार समितीमध्ये आपले वर्चस्व ठेवू शकले नाही. देऊळगावराजा बाजार समितीमध्ये आरोप प्रत्यारोपा नंतर सात वर्षाच्या कालावधी नंतर बाजार समितीची निवडणुक लागली. या निवउणुकीत माजी आरोग्यमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी पुन्हा एकदा शेतकºयांच्या हितासाठी बाजार समितीमध्ये शेतकºयांच्या हितासाठी बाजार समितीमध्ये नवीन संचालक मंडळ दि.२७ एप्रिल रोजी बाजार समितीत निवडून आणले. तालुक्यात विजयी जल्लोष साजरा करण्यात आला होता. तर तिन वर्ष उलटूनही शेतकºयांसाठी बाजार समितीच्या सभापती व संचालक मंडळा कडून कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही त्यामुळे सहकार नेत्यांच्या वचनाला सभापती व संचालक मंडळाकडून हूलकावनी देत असल्याची असंख्य शेतकºयांकडून नाराजीचा सुर निघत आहे. तर स्वहित जोपसण्यासाठी शेतकºयांना वेढीस धरण्याचे काम होत आहे. आज रोजी हजारो शेतकरी दररोज बाजार समितीत सोयाबीन, बाजरी, ज्वारी, गहू, उडीद, मुंग घेवून येतात. शेतकºयांना पशुधनासाठी अत्यंत मुलभूत सोयीसुविधा आवश्यक असल्याने आज रोजी बाजार समिती प्रशासनाकडून शेतकºयांना कोणतीही सुविध देण्यात येत नाही. बाजार समिती निवडणुकी दरम्यान स्व.भास्करराव शिंगणे सहकार पॅनलच्या प्रचारचा शुभारंभ करतांना राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आरोग्यमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी निवडणुक प्रचार नारळ फोडतांना दिलेल्या वचननाम्याला सभापती व संचालक मंडळांनी खो दिला म्हणून शेतकºयांच्या हिताच्या बांबीकडे असमर्थता दिसून येत आहे.


No comments:
Post a Comment