Friday, January 4, 2019

शेतकºयांच्या बांधावर कृषी विभागाचे मार्गदर्शन



बोंडअळीच्या नायनाटासाठी राठोड यांचे प्रात्यक्षिक   
देऊळगावराजा : (प्रतिनिधी) 
         मागील दोन वषार्पासून बोंडअळीने शेतकºयांचे नुकसान केले. आर्थिक गणित कोलमडून टाकण्याला कारणीभूत ठरलेल्या बोंडअळीचे समूळ उच्चाटन व्हावे, यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिंदखेड राजाचे तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांनी प्रत्यक्ष शेतकºयांच्या बांधावर जाऊन प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन सुरू केले आहे. बोंडअळीच्या नियंत्रणाकरिता सर्वांचाच पुढाकार महत्त्वाचा असल्याने कृषी विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन राठोड यांनी केले. 
        सिंदखेडराजा परिसरासह उगला, निमखेड, सोनोशी, गुंज आदी गावांमध्ये कृषी अधिकाºयांनी सेंद्रिय बोंडअळी निर्मूलन कार्यक्रम राबवण्यात आला. शेतक?्यांना मार्गदर्शन करताना वसंत राठोड म्हणाले, थ्रेशर मशीन कपाशीच्या काड्यांचे वेगाने बारीक तुकडे करते. त्यामुळे शेंदरी बोंडअळीच्या सर्व अवस्था नष्ट होतात व काड्यांचा चुरा, भुसा शेतात पडून जमिनीला सेंद्रिय खत मिळून जमिनीचा कस वाढतो. कपाशीचा खोडवा ठेऊ नये. कपाशीच्या शेतातल्या तणाचाही नाश करावा. बांधाची स्वच्छता करावी. शेतात उन्हाळ्यात भेंडी, अंबाडी सारखी पिके मुळीच घेऊ नयेत. सर्व प्रकारची स्वच्छता केल्यानंतर त्या क्षेत्राची खोल नांगरटी लगेच करावी. असे केल्यास जमीन उन्हाळाभर तापते. त्यामुळे जमिनीत सुप्तावस्थेत पडून राहिलेली कीड, रोगाचे जिवाणू अवशेष मरून जातात. बोंडअळी निर्मूलनाकरिता महिलांनी एकजुटीने समोर यावे, असे आवाहनही राठोड यांनी यावेळी केले. 
    
            

No comments:

Post a Comment