Friday, January 4, 2019

शित लहरीपणा मुळे शेतकºयांचे पिकांचे नुकसान



कृषी विभागाने पंचनामा करण्याची गजानन पवार यांची मागणी
देऊळगावराजा : (प्रतिनिधी) 
      कडाक्याच्या थंडीची लाट उसळली असुन हि थंडी शित लहर असल्याने  तालुक्यातील मक्का, शाळु, हरबरा, तुर या पिकांसह नेट मधील मिरची, क्राँसिंग भोपळा, वांगी, टोमँटो व भेंडीचे प्लाँट थंडीने उभी जळाल्याने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्यातील पिकांची तात्काळ पंचनामे करुन नैसर्गिक अपत्तीचा आहवाल देवून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी विधानसभा अध्यक्ष गजानन पवार यांनी तहसीलदार व कृषि विभागा यांचे कडे केली आहे.
        गेल्या २ ते ३ वर्षांपासुन शेतकरी भयंकर दुष्काळाला तोंड देत आहे. त्यातच आता हातातोंडाशी आलेल्या विविध पिकांसह फळबागा, क्रासिंग भेंडी, भोपळा, मिरची, टोमँटो, काकडी, कोबी यासारखे महागडे प्लाँटची शेतकºयांनी लागवड केली. २ ते ३ महिन्यांपासून शेतकरी ही पिके वाचविण्यासाठी रात्रंदिवस शेतात राबत आहे. मात्र, गेल्या आठवड्यात वातावरणात अचानक बदल होऊन चोहिकडे धुके पसरल्याने पिकांवर मोठ्या प्रमाणात अळी. शेतकºयांनी तडजोड करुन अळीचा नायनाट करण्यासाठी पिकांवर महागड्या किटकनाशकांची फवारणी केली. मात्र, त्याचा काही एक फायदा झाला नाही. एकिकडे पिकाला भाव नाही तर दुसरीकडे निसगार्ची साथ मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदा रब्बीचे पिके चांगल्या प्रमाणात बहरल्याने थोड्या फार प्रमाणात का होईना डोक्यावरचा कजार्चा भार कमी होण्यास मदत होईल, अशी आशा शेतकºयांना होती. परंतु अचानक पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे शेतकºयांची उभी पिके जळाल्याने शेतकºयांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. त्यामुळे तालुका कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाची पिंकाची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करावे, व नैसर्गिक अपत्तीचा आहवाल देवून नुकसान भरपाई देण्यात अशी मागणी सिंदखेडराजा विधानसभा अध्यक्ष गजानन पवार यांनी केली आहे. 


      





















       
      

No comments:

Post a Comment