गजानन पवार यांना अनोखी भेट
देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
अहोरात्र झटून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संघटन मजबूत करणारे निष्ठावान कार्यकर्ते गजानन पवार यांना सिंदखेड राजा मतदारसंघात फिरण्याकरिता काही निवडक पदाधिकारी व ग्रामस्थांनी वर्गणी जमा करून १ लाख रुपयांचे डिझेल कार्ड भेट म्हणून दिले.
राजकीय क्षेत्रात एक होतकरू, प्रामाणिक आणि राष्ट्रवादीचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून गजानन पवार यांच्याकडे पाहिल्या जाते. सुरुवातीला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सलग दहा वर्षे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. तालुक्यात युवकांची फळी निर्माण केली. संघटनेला राजसत्तेची जोड मिळावी म्हणून डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद दिले. मिळालेल्या संधीचे सोने करावे या हेतूने प्रेरित होऊन गरजू लोकांना योजनेचा लाभ मिळवून दिला. त्यानंतर अंगणवाडी निवड समितीचे अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पदाला त्यांनी न्याय दिला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र अध्यक्षपद मिळाले. विधानसभा क्षेत्राची जबाबदारी मिळाल्यानंतर चिखली, लोणार, सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात ते दुचाकीने फिरतात. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने काही सहकाºयांनी अर्थसाह्य करून चारचाकी गाडी घेऊन दिली. मात्र त्यामुळे आर्थिक खर्चात आणखी वाढ झाली. पक्ष संघटने स्वत:ला झोकून देऊन दिल्याने गजानन पवार यांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय त्यांच्या हितचिंतक व ग्रामस्थांनी घेतला. वाढदिवशी त्यांना १ लाख रुपयांचे डिझेल कार्ड भेट देण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती महेश देशमुख, माजी सभापती नितीन शिंगणे, डॉ. निखिल शिंदे, अनिल रामाने, गणेश बुरकूल, सुधाकर माटे, उद्धव म्हस्के, सुभाष कव्हळे, भास्कर बंगाळे, अमोल बंगाळे, राजू चित्ते, अरविंद खांडेभराड उपस्थित होते.


No comments:
Post a Comment