जनावरांसाठी चारा छावण्या उभाराव्या : राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान शिंगणे
देऊळगाव राजा : (प्रतिनिधी).
देऊळगाव राजा व सिंदखेड राजा तालुक्यात भीषण दुष्काळ आहे. या दोन्ही तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्न बिकट झाला आहे. शासनाने गावे तेथे पाणी टॅंकर तसेच जनावरांसाठी चारा छावण्या उभाराव्या, अशी मागणी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान शिंगणे यांनी केली आहे..
दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले हे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निम्माही पाऊस झाला नाही. पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक वाया गेले त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. चारापाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सध्या शेतकऱ्यांना चारा विकत घ्यावा लागत आहे. त्यामुळे शासनाने जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्न सोडवावा तसेच गावोगावी पाणीटॅंकर सुरु करावे, गेल्या काही दिवसांपासून परिसरात थंडी पडली असून यामुळे फळबागा पूर्णपणे उध्वस्त होत आहेत. फळबागांचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान शिंगणे यांनी केली आहे..


No comments:
Post a Comment