Saturday, January 5, 2019

रफीक कुरेशी नेहा फ़िल्म अवार्डने संमानित।

मेहकर : (प्रतिनिधी).
        फिल्म अॅक्टर असोसिएशन औरंगाबाद च्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट अभिनेता म्हणून दिला जाणारा नेहा फिल्म अवर्ड 2018 चित्रपट अभिनेते रफिक कुरेशी यांना 30 डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह मध्ये आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. 
           फिल्म अॅक्टर असोसिएशन च्या वतीने चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना गेल्या दहा वर्षापासून विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील चित्रपटअभिनेते रफिक कुरेशी यांनी हिंदी चित्रपट "हक़ ए सैलानी "या चित्रपटात महत्त्वाची भूमिका उत्कृष्टपणे केल्याबद्दल यावर्षीच्या उत्कृष्ट अभिनेता म्हणून "नेहा फिल्म अवार्ड2018 "हा चित्रपट असोशियन चे संस्थापक अध्यक्ष मोहम्मद मोहसिन ज्येष्ठ मार्गदर्शक मोहम्मद नसीम अशोक शिंदे जेष्ठ विचारवंत पटेल महाराष्ट्र प्रदेश मुख्य महासचिव समशेर दुखती प्रसाद महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गोरख भारसाकळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला रफीक कुरेशी यानी या पूर्वी मराठी चित्रपट शेतकरी पुत्र  हीच बायको पाहिजे,  अर्शी नको सून बाई , हिंदी चित्रपट  सुल्तानी महाराष्ट्र, सावट आदि चित्रपटात काम केले आहे ,यावेळी राज्यभरातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे निर्माते प्रोडूसर संवाद लेखक अभिनेते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

No comments:

Post a Comment