|
| |
देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
|
|
|
चोरी गेलेला रिक्षा देऊळगाव मही पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात जप्त करून आरोपीस अटक केली आहे. दरम्यान या चोरी प्रकरणातील आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
देऊळगावमही येथील भगवान तात्याराव झोटे यांचा रिक्षा मंगळवार रात्रीचे सुमारास चोरीस गेला होता. बुधवारी सकाळी भगवान झोटे यांनी देऊळगाव मही पोलीस चौकीत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांना तपासाला सुरुवात केली. तक्रारीत नोंद केलेल्या आरोपीस ताब्यात घेऊन चौकी इन्चार्ज अकील काझी यांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी विजय सजेर्राव शिंगणे वय २३ रा. देऊळगावमही याने गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी गारखेड शिवारातून एम एच २८/ टी/ ४१४ या क्रमांकाचा अॅपे जप्त केला. ही कारवाई ठाणेदार सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली देऊळगांवमही पोलीस चौकीचे इन्चार्ज अकील काजी, पोलीस नाईक संदीप बालोद, सुनील सुरडकर, रुपेश जोरवार यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment