देऊळगावराजा : (अशरफ पटेल)
मराठी पत्रकारितेच्या विचार विश्वात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरासारखी विलक्षण कामगिरी बजावणारे बाळशास्त्री जांभेकर हे त्यामुळे युगप्रवर्तक पत्रकार ठरले. दि.६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण चा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने दर्पण आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले. असे प्रतिपादन मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षा सुषमा राऊत यांनी केले.
स्थानिक सुरुचि हॉटेलच्या भाव्य प्रागणांत दि.६ जानेवारी रोजी पत्रकार दिनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस माल्यर्पन करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षा सुषमा राऊत होत्या. तर प्रमुख पाहुने म्हणून डिग्रस बु. सरपंच भारत पाटिल है होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक सचिव प्रशांत पंडित यांनी संघाच्या वर्ष भरात घेण्यात आलेले कार्यक्रम व विविध केलेल्या कार्याची सखोल माहिती दिली. या प्रसंगी मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जिवनावर प्रकाश टाकला. पुढे बोलतांना राऊत म्हणाल्या की, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावी १८१२ मध्ये बाळशास्त्रींचा जन्म एका पुराणिकाच्या घरी झाला.. अज्ञान,दारिद्रय आणि रुढीप्रिय समाजाच्या अंध:कारातून बाहेर पडण्यासाठी सन १८२५ मध्ये ते मुंबईत आले. मुंबईत बापू छत्रे यांच्या निवासस्थानी राहून त्यांनी अध्ययन सुरू केले. आपल्या विलक्षण बुध्दीचातुयार्ने व तल्लख स्मरण शक्तीने त्यांनी त्या वेळच्या मुंबईतील सार्वजनिक जीवनावर विलक्षण छाप टाकली. सन १८३० मध्ये हिंद शाळा पुस्तक मंडळाचे सेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि एक नवे क्षितिज त्यांच्यासाठी खुले झाले. सन १८३१ मध्ये त्यांनी ग्रंथ रचनेस प्रारंभ केला. त्यानंतर वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या पत्राची मुहूर्तमेढ रोवली. म्हणुन हा पत्रकार दिन साजरा करण्यात येतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजीत खिल्लारे यानी केले तर आभार बाबासाहेब साळवे यानी मानले. यावेळी मातृतीर्थ . यावेळी मातृतीर्थ पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अध्यक्ष प्रकाश साकला, सचिव प्रशांत पंडित, कोषाध्यक्ष रमेश चव्हाण, तालुका प्रसिद्धी प्रमुख रंजित खिल्लारे, शहर प्रसिद्धी शब्बीर खान पठाण, सल्लागार अशरफ पटेल, सल्लागार सौ.जया सन्मती जैन, सदस्य ओम पºहाड, जुनेद कुरेशी, बाबासाहेब साळवे, ज्ञानेश्वर म्हस्के, पंढरीनाथ गिते, शिवाजी वायळ, अंबादास बुरकुल, अल्ला नवाज, राजेश पाटील, बापू वाघ, राजेश पाटील, गजानन चोपडे, वैजिनाथ खंदारे, किरण पांगरकर, अखतर खान, पुजा कायंदे, वसंता माळोदे, विलास जाधव, प्रकाश बस्सी, रवि जाधव आदी पत्रकार उपस्थित होते.




No comments:
Post a Comment