Wednesday, January 16, 2019

भगवान बाबाच्या मूतीर्ची विटंबना;



कारवाईबाबत ठाणेदारांना निवेदन  
देऊळगाव राजा : (प्रतिनिधी) 
        भगवान बाबाच्या मूतीर्ची विटंबना करणाºयावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दि.१५ जानेवारी रोजी डॉ.सुनिल कायंदे यांच्या नेतृत्वात सर्व समाजाचे नागरिकांनी एका निवेदनाद्वारे ठाणेदाराकडे केली आहे. 
        त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, राष्ट्रसंत भगवान बाबा यांची मूर्ती सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्यात स्थापन करण्यात आली होती. तिचे राहिलेले अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी काही भाग अहमदनगर येथील भाळवणी येथील शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओमध्ये देण्यात आले होते. मूतीर्चे काम चालू असताना त्याचे काही भाग अज्ञात व्यक्तीने स्टुडिओ मधून बाहेर शेतात नेऊन जाळल्याची घटना दि.१३ जानेवारी रोजी घडली. त्यामुळे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूतीर्ची विटंबना करणाºयावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉ.सुनिल कायंदे, डॉ.गणेश मान्टे, मनोज कायंदे, गजानन पवार, राजु सिरसाट, एकनाथ काकड, सदाशिव मुंडे, रणजित काकड, महेश देशमुख, अमोल काकड, रामु खांडेभराड, गणेश मुंढे, शाकेर लाला, मोहसीन शेख, डॉ.सुनिल कायंदे मित्र मंडळचे पदाधिकारी व कार्यकर्ते, आदी सर्व समाज बांधव यांनी केली आहे. 
             
 
   

No comments:

Post a Comment