मुलीचा आई, वडिलांकडे जाण्यास नकार : युवकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल
पाडळी शिंदे : (प्रतिनिधी).
प्रेमाच्या आनाभाका घेत पळून गेलेले प्रेमीयुगुल दीड महिन्यानंतर २ जानेवारी रोजी गावात परतताच नातेवाईकांनी दोघांनाही पोलिसांच्या स्वाधीन केले. मुलगी पळून जाताना अल्पवयीन असल्याने युवकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मुलीने आई, वडिलांसोबत जाण्यास नकार दिला, तर माता-पित्यानेसुद्धा मुलीला झिडकारले. त्यामुळे तिला बाल सुधारगृहात पाठविण्यात आले. .

अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंत्री खेडेकर येथील एका अल्पवयीन मुलीसोबत गावातीलच २३ वर्षीय युवकाचे प्रेमाचे सूत जुळले. १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दोघांनी गावातून पलायन केले. ही घटना उघडकीस येताच मुलीच्या आजोबांनी अंढेरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. दीड महिन्यापासून दोघांचाही थांगपत्ता लागला नव्हता. दरम्यान, २ जानेवारी रोजी दोघेही गावात परतले. दोघांमुळे दोन कुटुंबातील वातावरण बिनसले होते. त्यामुळे त्यांना अंढेरा पोलिसांच्या हवाली करण्यात आले. मुलगी प् ाळून गेली त्यावेळी ती सज्ञान नव्हती. परतल्यानंतर ती १८ वर्षांची झाली होती. अल्पवयीन असताना पळवून नेले म्हणून त्या युवकाविरुद्ध भादंवि कलम ३६३, ३६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. महिला दक्षता अधिकाऱ्यांसमोर उभे केले असता मुलीने आई, वडिलांकडे जात नसल्याचे सांगितले, तर आई, वडिलांनीसुद्धा मुलीने समाजात इभ्रत घालविली म्हणून नेण्यास नकार दिला. त्यामुळे तरुणीला बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली. पुढील तपास दुय्यम ठाणेदार व्ही.एल. कवास यांच्यासह सतीश जाधव, समाधान झिने, वैशाली पवार करीत आहेत..

No comments:
Post a Comment