विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून अध्ययनावर भर द्यावा. विद्यार्थ्यांनी हक्काबरोबर कर्तव्याची जाणीव ठेवावी. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मस्वातंत्र्य आदी गोष्टींमुळे भारतीय समाज एकसंघ राहिलेला आहे. असे प्रतिपादन श्री शिवजी हाइस्कूल चे प्रा. संजय देशमुख यानी राष्ट्रीय सेवा योजनेत ग्राम पिंपळगांव चिलमख़ाँ येथे केले.
श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या वतीने दर वर्षी विद्यार्थया साठी राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर आयोजन करण्यात येतो. या वर्षी दि.६ जानेवारी ते १३ जानेवारी पर्यंत ग्राम पिंपळगांव चिलमख़ाँ येथे केले. या कार्यकर्माच्या अद्यक्ष स्थानी प्रा.डॉ. उमेश देशमुख होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.संजय देशमुख होते. या प्रसंगी मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या अद्यक्षा सुषमा राऊत, सचिव प्रशांत पंडित, सल्लागार अशरफ पटेल यांनी भेट दिली. पुढे बोलताना प्रा.देशमुख म्हणाले की, विद्यार्थयानी आपला जीवन कसा जगावा त्यासाठी शिक्षाणांची अत्यंत महत्वाची गरज आहे. यावेळी मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या अद्यक्षा सुषमा राऊत यांनी शिक्षणा महत्व पटवून दिला. ७ दिवसात ग्राम स्वछता, आरोग्य तपासणी, रक्त गट तपासणी, रक्तदान शिबीर, व्यक्तिमत्व विकास, पर्यावरण जागृती, व्रक्ष रोपण, अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती असे कार्यामाचे आयोजन करण्यात येत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.मधुकर जाधव यांनी व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.



No comments:
Post a Comment