Thursday, January 10, 2019

बस स्थानकाचा ठराव कागदावर राजकीय नेत्यांच्या हेवादाव्यामुळे बस स्थानकाचा प्रश्न अद्यापही कायम


राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्ती अभावी रखडला चाळीस वर्षापासुन  देऊळगामही बस स्थानकाचा  प्रश्न 
देऊळगावमही - (गजानन चोपडे )
 देऊळगावराजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून  देऊळगावमही गावाची ओळख सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक ,औद्योगिक महत्व असलेल्या गावाला तीस ते चाळीस खेडी जोडली असुन गेल्या तीस ते चाळीस  वर्षापासुन राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्ती अभावी बस स्थानक प्रश्न अद्यापही कायम असुन प्रवाश्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे .  
       देऊळगावमही नगरीत अनेक शाळा कॉलेज  राष्ट्रीयकृत बँका , शासकीय , निमशासकीय अनेक उदयोग या ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते मात्र गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांची मागणी  लक्षात घेऊन या ठिकाणी बस स्थानक व्हावे या साठी असंख्य निवेदन , उपोषणे गावकऱ्यांनी केले मात्र नागरिकांच्या मागणीला राजकीय नेत्यांची उदासीनता तसेच  श्रेयवादामुळे बस स्थानकाचा प्रश्न अद्यापहि कायम कायम असुन प्रवाश्यांना तीनही ऋतूत मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो तसेच हे गाव राष्ट्रीय महामार्गावर वसलेले असल्यामुळे   या ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाश्याची गर्दी मोठ्या प्रमाणात असते मात्र नागरिकांनी बस स्थानक व्हावे या साठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे धाव घेतली प्रवाश्याची गरज लक्षात घेऊन कागदपत्राची पूर्तता करुन परिवन खात्याकडे प्रस्थाव करावा आवश्यक तो निधी उपलब्ध करून मजुरात देण्यात येईल  असे आश्वासन परिवनमंत्र्यांनी दिले मात्र  राष्ट्रीय महामार्गाला लागुन 81आर ग्रामपंचायत मालकीची  असलेली पशु वैदकीय दवाखान्याच्या ताब्यात जमीन आहे मात्र या ठिकाणी बस स्थानकासाठी 30 आर जमीन बस स्थानक , 20 आर पशुवैद्यकीय दवखानाची इमारत , 31 आर जमीनिवर शॉपीग कॉम्प्लेक्स ,ग्रामपंचायत कामासाठी राखीव   असा ठराव ग्रामपंचायत घेण्यात आला असुन    राजकीय उदासीनतेमुळे बस  स्थानकाचा प्रश्न प्रतीक्षा नागरिकांना अद्यापही  कायम आहे. या ठिकाणी विविध पक्षाचे खंडीभर नेते असुन विकासाच्या नावावर केवळ पोकळ घोषणा करून नेहमीच मतापुरते  स्वस्वार्थ  साधत असतात त्यामुळे गावकऱ्यांना विविध समस्सा कायम असुन गावचा विकास रखडला असून दिवसेंदिवस गावचे वैभव हरवत आहे 

...........…........

बस स्थानकाच्या प्रश्नांसाठी मंत्रालयास्थरावर वारंवार पाठपुरावा करून परिवन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने बस स्थानकासाठी जमीन हस्थातरीत न केल्याने प्रश्न अद्यापही कायम आहे . ग्रामपंचायत प्रशासाने जागेचा प्रश्न निकाली लावल्यास लवकरच परिवहन विभागाकडुन निधी उपलब्ध करून दिल्या जाईल.
  डॉ . शशिकांत खेडेकर -आमदार सिंदखेडराजा मतदार संघ 
.....….................….............

बस स्थाननकाच्या जागेसाठी ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित विभागाकडे मोजणी साठी अर्ज केला असुन या जागेची मोजणी करून बस स्थानककाच्या जागेसाठी हस्तांतरीत करण्यात येईल तसेच पशु वैदकीय दवाखान्याचा इमारतीसाठी 35 लक्ष रुपयाचा निधी मंजूर केला असुन लवकरच सुसज्ज इमारत बनवण्यात येईल.
       रियाँज खान पठाण जिल्हा परिषद सदस्य देऊळगावमही
...........….............................

राजकीय पक्षातील नेत्यांनी मतभेद बाजूला सारून एकत्र यावे 
गेल्या अनेक वर्षांपासून देऊळगावमाहि बस स्थानकाचा प्रश्न कायम असुन गावच्या विकासाठी राजकीय पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन बस स्थानक तसेच इतर गावाच्या समस्या साठी एकत्र येण्याची गरज आहे मात्र राजकीय पक्षातील नेत्यांचे  हेवेदावे व उदासीनतेमुळे गावच्या विकासाच्या समस्या आजही कायम आहे.
       प्रदीप नागरे  जिल्हा सरचिटणीस राष्ट्रीय काँग्रेस पार्टी 
..........................................................

बस स्थानक प्रश्नांसाठी लढा सुरूच ठेवणार 
देऊळगावमही येथे बस स्थानक व्हावे या साठी अनेक निवेदन तसेच उपोषण केले मात्र संबंधित प्रशासनाने अद्यापही कुठलेच ठोस उपाययोजना  न केल्याने बस स्थानकाचा प्रश्न आजही कायम आहे  मात्र जोपर्यत बस स्थानकाचा मार्गी लागत नाही तोपर्यत लढा सातत्याने सुरुच ठेवणार.
                    कैलास राऊत शहर अध्यक्ष भाजप 
.......................................

भूखंड माफियांनी कोट्यवधी रुपयांची जागा बळकवण्याचा केला होता प्रयन्न राष्ट्रीय महामार्गालगत असलेली शहराच्या मध्यस्थितीत असलेली  ग्रामपंचायत प्रशासनाच्या मालकीची सध्या पशु वैदकीय दवाखान्याचा ताब्यात असुन 81 आर जमीन काही वर्षांपूर्वी भुखंड माफियांनी हडप करण्याचा प्रयत्न केला होता मात्र गावातील जागृत नागरिकांनी हा डाव हाणून पाडला मात्र याच जागेवर बस स्थानक , पशु  वैदकीय दवाखाना , शॉपिग कॉम्प्लेक्स व्हावे अशी नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे मात्र या मागणीला राजकीय नेत्यांनी केराची टोपली दाखवली  गावातुन अनेक राजकीय नेत्यांची जडण घडण झाली मात्र आत्तापर्यंत अनेक पक्षातील नेत्यांनी केवळ विकासाच्या पोकळ घोषणा करून राजकीय पोळी शेकून घेतली बस स्थानकाचा प्रश्न केव्हा मार्गी लावणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करत आहे.

No comments:

Post a Comment