स्वातंत्र्याचा काळापासुन पत्रकारितेच्या क्षेत्राकडे जीवनाची सेवा म्हणून बघितल्या जातात दर्पणकार बाळकृष्ण जांभेकर , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , महिला पत्रकार ताणुबाई बिर्जे ,अशा विविध महापुरुषांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठे योगदान देऊन निर्भीड निःपक्षपाती लिखाण करून अन्याय ,अत्याचार ,विषमता यांच्या विरुध्द वृत्तपत्रात आवाज उठवून सर्व घटकातील समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला मात्र बदलल्या काळानुसार पत्रकारिता कडे व्यवसायच्या नजरेने बघितल्या जाते पत्रकारिता करत आसलेल्या तरुण युवकांनी महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर अन्याय ,अत्याचार ,भ्रस्थाचार ,गुंडगिरी यांच्या विरुध्द पत्रकारितेच्या माध्यमातून निर्भीड ,निःपक्षपाती लिखाण करून सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळून देऊन आदर्श निर्माण करावा असे प्रतिपादन प्रा कमलेश खिल्लारे यांनी पत्रकार दिनानिमित्त केले .
कबीर फाऊंडेशन व आशाताई सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा कमलेश खिल्लारे , तर प्रमुख पाहुणे निसार सेट , गजानन पाटील , प्रदीप हिवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती या वेळी निसार सेट ,प्रदीप हिवाळे ,गजानन पाटील , सुनील मतकर ,संतोष जाधव , रणजित खिल्लारे, बाबासाहेब सावळे , अमोल बोबडे , शेख अत्तर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर प्रकाश साकला, शेख उस्मान, पांडूरंग शिंगणे ,अंबादास बुरकुल ,रवी जाधव ,गणेश वाघ समाधान शिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती या वेळी सूत्रसंचालन राम पऱ्हाड यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन पाटील यांनी मानले.


No comments:
Post a Comment