बॅनरमध्ये मोक्का कायद्यांतर्गत अटकेत असलेल्या आरोपीचा फोटो लावण्यात आल्याने मातृतीर्थ मतदार संघात खड़बड़
बुलडाणा - विशेष प्रतिनिधी
राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा सुरू आहे. त्यानिमित्ताने आज जिल्ह्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आले होते. यावेळी मंचावर लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये मोक्का कायद्यांतर्गत अटकेत असलेल्या आरोपीचा फोटो लावण्यात आल्याने मातृतीर्थ मतदार संघात खड़बड़ माजली.
फोटो लावण्यात आलेला आरोपी राष्ट्रवादीचा विद्यमान नगरसेवक आहे. त्याचा फोटो लावल्याने राष्ट्रावादी या आरोपीचे समर्थन तर करीत नाही ना? असा प्रश्न स्थानिकांकडून तसेच मातृतीर्थ मतदार संघात उपस्थित होत आहे. काही काळ पूर्वी पुणे शहर पोलीस दलातील शैलेश जगताप यांचे भाऊ जितेंद्र जगताप यांनी २ जूनला रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिपक मानकर, सुधीर कर्नाटकी यांच्यासह काहीजण आत्महत्येस कारणीभूत असल्याचे लिहिले होते. रास्ता पेठेतील एका जागेच्या वादातून हा प्रकार घडला होता. नगरसेवक दिपक मानकर हा सध्या तुरुगांत आहे. मानकरवर या गुन्ह्याशिवाय इतरही गुन्हे दाखल आहेत. आज रोजी मातृतीर्थ मतदार संघात माजी मंत्री डॉ. शिंगने यांचा गेल्या २० वर्ष अधिराज्या होते. तसेच संपूर्ण जिल्ह्यात वेगळी ओळख असल्याने दि.२० जानेवारु रोजी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर येथील राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रेत चक्क बैनर वर मकोका मधे अटक असलेले राष्ट्रवादी चे नगर सेवक मानकर च्या फ़ोटो असल्याने चर्चेंला उधान आले आहे. येणाऱ्या निवडनुकता याचा काय परिणाम होते. येणाऱ्या काळात समोर येणार.



No comments:
Post a Comment