Tuesday, January 22, 2019

"न्युज मार्केट" या वृत्तसंस्थेचे समाजसेवक आण्णा हजारेंनी केले उद्घाटन



शिर्डी : प्रतिनिधी

        महाराष्ट्रातून राष्ट्रीय स्तरावर काम करणारी वृत्तसंस्था "न्यूज मार्केट" चा अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे पत्रकारांच्या साक्षीने व ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या हस्ते अधिकृतपणे उद्घाटन करण्यात आले.
     "न्यूज मार्केट" ही वृत्तसंस्था मराठी, हिंदी या भाषांमधून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तवाहिन्यासाठी वृत्त पुरवण्याचे काम करते. या वृत्तसंस्थेची विशेषता म्हणजे संस्था सर्वसामान्यांपासून ते या वृत्तसंस्थेचे अधिकृतपणे काम करणारे पत्रकार यांची बातमी वृत्त वाहिन्या पर्यंत पोचवली जाते. त्याच्यासाठी "न्युज मार्केट" या नावाने एक अँड्रॉइड ॲप्लिकेशन विकसित करण्यात आलेले आहे. या ॲप्लिकेशन मध्ये सामान्य व्यक्ती, इतर पत्रकार ते या वृत्तसंस्थेचे अधिकृत प्रतिनिधी यांना बातमी पाठविता येणार आहे. प्रसिद्ध होणाऱ्या बातमीचे  मानधन काही टक्के कट करून बाकी सर्व पैसे बातमी अपलोड करणाऱ्या प्रतिनिधीच्या खात्यामध्ये पोचवणे असा याचा उद्देश आहे.29 जानेवारीला महाराष्ट्रमधील या वृत्तसंस्थेचे सर्व प्रतिनिधि, पदाधिकारी शिर्डी येथे उपस्थित होते व या संस्थेमध्ये कशा पद्धतीने काम केले जाईल, येणाऱ्या काळामध्ये आव्हाने या बाबत सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकी नंतर त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या हस्ते "न्युज मार्केट" ची अँड्रॉइड ॲप्लिकेशनचे अधिकृतरीत्या उद्घाटन करण्यात आले. यावेळी आण्णांनी या वृत्त संस्थेस शुभेच्छा देत येणाऱ्या काळामध्ये भ्रष्टाचार मिटवण्यासाठी या वृत्तसंस्थेने बनवलेले एंड्रॉइड ॲप्लिकेशन फायदेशीर ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी वृत्तसंस्थेचे प्रमुख अशोक पवार सांगली, बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी कासिम शेख, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी हफिज शेख, अकोला प्रतिनिधी अन्वर खान, त्याचबरोबर सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment