भला किस काम की एैसी तरक्की, लहू सस्ता पाणी बिक रहा है
मॉ जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त, एक शाम माताओ के नाम
देऊळगांवमाहित मुशायरा' खूपच रंगला
देऊळगांवराजा : अशरफ पटेल
आल्हाददायक हवेने भरलेला आसमंत.. संध्याकाळची कतरवेळ..दर्दी श्रोत्यांची हजेरी.. दिग्गज शायरांची श्रेष्ठ शायरी तालुक्यातील देऊळगांवमही येथे मॉ जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त दि.२० जानेवारी रोजी देऊळगांवराजा तालुका एमआईएम पक्षाच्या वतीने एक शाम माताओ के नाम कवि समेलन व मुशायरा खूपच रंगला. संध्याकाळी वाह वाह क्या बात है, चा आवाज घुमला एक से बढकर एक नाव गाजलेल्या शायरांच्या उपस्थितीत तालुक्यात प्रथम आयोजन करुन एक वेगळी ओळख निर्माण केली.
दि.२० जानेवारी रोजी तालुक्यातील देऊळगावमहीच्या सामाजिक सभागृह मध्ये एमआयएमच्या वतीने आयोजित एक शाम माताओ के नाम बहारदार मुशायरा व कवि समेल्लनचा आयोजन मॉ जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त करण्यात आले. या कवि समेलनाच्या महाराष्ट्रतील नामवंत शयर आणी कवि जाकीर पटेल, मुबश्शीर पटेल, मुमताज बशर, कलीम कैफ, शाहरुख सैफ, शेख मुशीर, शादाब पटेल, मुजाहीद खान, शेख जावेद, इम्रान पठाण तसेच प्रमुख पाहूणे म्हणून माजी सभापती शेख सिद्दिक कुरेशी, सरपंच सुभाष शिंगणे, तंटा मुक्ती अध्यक्ष संभाजी शिंगणे, उबेद भाईजान चिखली, शिवसेना शहरप्रमुख भरत शिंगणे, अकबर, जावेद, अखतर, पत्रकार सुनिल मतकर, संतोष जाधव, शेख उस्मान, अमोल बोबडे, आदील पठाण आदी उपस्थित होते. शेर, गझल, कविता, शायरी अशा काव्यभावांमधून मुशायºयाने उपस्थितांची मने जिंकली मुशायराºयाचा सुरुवातीत रचनांना चांगला प्रतिसाद मिळाला.
" गमो को बाटनेवाला ही इंसान बनता है
और वो हिंदू हो या मुस्लीम हो सिख हो या इसाई हो
ये सब एक साथ मिलते है तो हिंदूस्तान बनमा है "
आई वरचा शेर सागळ्यांना भावून गेला.
" बूढे माँ, बाप है साथ मेरे
मेरे घर मे खजाना पडा है
सत्य को जब मैने कहा
मेरे पिछे जमाना पड है
उसके दर का जो आया बुलावा
तो सुरमाओं को जाना पडा है
रोशनी के लिए हमको तनहा
अपने घर को जलाना पडा है "
वर्तमान राजकीय परिस्थीतीवर शाब्दिक आसूड ओढण्याच्या सर्वानी आपल्या परी रंग भरला तरर पुढचा श्ेर
" हिम्मत नही परवाज की, परताल गगनको
कश्ती को ना बदलो, मियाँ पतवार बदल दो
बर्बाद ना हो जाये, कही ये तेरा नशेमन
सरदार है मुश्किल में तो सरदार बदल दो "
सर्वाच्या शेर आणि कवितेने माहौल बनवून टाकला होता. मुशायºयात शायरीचे विविध रंग उधळले गेले. ज्यांनी प्रेक्षक आणि श्रोत्यांना रंगवून टाकले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एमआयएमचे तालुकाध्यक्ष शेख हनिफ, शहराध्यक्ष रहिम खान, उपाध्यक्ष दस्तगीर कुरेशी, देऊळगावराजा शहराध्यक्ष शेख अकिब, उपशहरध्यक्ष शेख अतीक, जुनेद कुरेशी, तालीब कुरेशी, कलीम शेख, अलीम मिर्झा, नासेर कुरेशी, कलीम कुरेशी, अली कुरेशी, सै.नईम आदीनी परिश्रम घेतले.


No comments:
Post a Comment