नायब तहसीलदार मदन जाधव यांचा गौरव
देऊळगावराजा : (अशरफ पटेल)
पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना दैनंदिन कामकाजा सोबत सामाजिक बांधिलकी जोपासणारा पत्रकार हा सामाजिक चळवळीचा मुख्य प्रवाह म्हणून आपले कार्य नेहमी प्रामाणिकपणे सुरु ठेवतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणा सोबत खडे बोल बोलण्याचे व्यासपीठ उपलब्ध करुन देणे म्हणजे विद्यार्थ्यांना स्पधेर्तून यशाची महत्त्वपूर्ण दिशा मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी केले.
देऊळगावराजा तालुका पत्रकार संघाच्या वकृत्व स्पधेर्चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते उद्घघाटक म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार दीपक बाजड, पोलिस निरीक्षक सारंग नवलकार, पंचायत समिती सभापती पती गजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान शिंगणे, सरपंच सविता शिंगणे, तंटामुक्ती अध्यक्ष संभाजी शिंगणे, शिवसेना नेते गुलाबराव शिंगणे, देऊळगाव अर्बन अध्यक्ष रवींद्र कोटेचा, पर्यवेक्षक राजू चित्ते, बाजार समिती संचालक मन्नानखाँ पठाण, डॉ. महेश दंदाले, जगदीश कापसे, मातृतीर्थ पत्रकार संघाच्या अध्यक्षा सुषमा राऊत, सय्यद सईद, प्राचार्य सचिन खरात, वामनराव शिंगणे, सुभाष शिंगणे, अनंथा इंगळे, अशोक पाबळे, दराडे, कावेरी पडघान, संदीप राऊत, स्वप्निल शहाणे, सुनील दंदाले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पुढे बोलताना ते म्हणाले की, पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील विविध दुर्लक्षित समस्या मांडत त्या शासनापर्यंत कशा पोहोचतील, यासाठी नेहमी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी तहसीलदार दीपक बाजड, नायब तहसीलदार मदन जाधव, पोलिस निरीक्षक सारंग नवलकार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. पत्रकार दिना निमित्त स्थानिक सर्व शाळेतील वर्ग ९ ते १२ च्या विद्यार्थ्यांची सात विषयाची वक्तृत्व स्पर्धा ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत १४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये शरदचंद्र पवार ज्युनिअर कॉलेज वर्ग १२ वीचा विद्यार्थी वशीम शहा याने प्रथम बक्षीस ११११ रुपये व सन्मानचिन्ह पटकावले. तर द्वितीय बक्षीस वर्ग ११ वा विद्यार्थिनी शीतल डोईफोडे ७७७ रुपये व सन्मानचिन्ह व तृतीय बक्षीस श्री शिवाजी विद्यालयाची वर्ग ९ वीची विद्यार्थिनी वैष्णवी रायकर हिने ५५५ रुपये सन्मानचिन्ह व प्रोत्साहनपर बक्षीस स्वामी विवेकानंद विद्यालय वर्ग ९ वा विद्यार्थिनी पूनम बनसोडे हिला देण्यात आले. पत्रकारिता क्षेत्रातून देऊळगावराजा नायब तहसीलदार पदावर कार्यरत इरादा फाउंडेशनच्या माध्यमातून अनाथ मुलांना शिक्षणासाठी मदत व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे नायब तहसीलदार मदन जाधव यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्याच बरोबर देऊळगावमही नगरीत गेल्या पाच वर्षांपासून पोलिस क्षेत्रात विविध गुन्ह्यातील तपासाला गती देणारे व सामाजिक एकात्मता जोपासणारे पोलिस ठाण्याचे प्रमुख अकील काझी यांनाही सन्मानचिन्ह देऊन तालुका पत्रकार संघाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक प्रदीप हिवाळे यांनी तर सूत्रसंचालन सुनील मतकर यांनी केले. कार्यक्रमासाठी संतोष जाधव, अमोल बोबडे, शेख उस्मान यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाचे सचिव प्रशांत पंडित, ताुलका प्रसिद्धी प्रमुख रंजित खिल्लारे, सदस्य अंबादास बुरकुल यांची उपस्थित होती.



No comments:
Post a Comment