Friday, January 11, 2019

युवक काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्षपदी टोनू सावजी


  देऊळगावराजा : (अशरफ पटेल) 
          बुलडाणा जिल्हा युवक काँग्रेस सेवादल पदाधिकाºयांची निवड नुकतीच पार पडली असून, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांच्या सुचने नुसार बुलडाणा जिल्हा युवक काँग्रेसच्या सेवादल अध्यक्षपदी टोनू सावजी यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. नुकतेच दिल्ली येथे मुकुल वासनिक यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रादन करण्यात आले.
         येणाºया लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेवून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वाढीव साठी युवकां संधी देणयत येत आहेत नुकतेच बुलडाणा जिल्हा युवक काँग्रेस सेवादल पदाधिकाºयांची निवड करण्यात आली. त्यात देऊळगावराजा येथील माजी नगरसेवक अनिल सावजी यांनी काँग्रेस पक्षासाठी निष्ठावन कार्यकर्ता म्हणून कार्य करीत आहे. म्हणून काँग्रेस पक्षाने दखल घेवून त्यांचे सुपुत्र टोनू सावजी यांची बुलडाणा जिल्हा युवक काँग्रेसच्या सेवादल अध्यक्षपदी निवड करुन त्यांना भेट दिली. येणाºया काळात पक्षाच्या वाढीव साठी आणि एक निष्ठावन कार्यकर्ता म्हणून कार्य करीत राहिल अशी ग्वाही टोनू सावजी यांनी दिली. त्याच्या निवडी ने शहरात पक्षाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. 
                


  

1 comment: