श्री व्यंकटेश महाविद्यालयाचे रा.से.यो. शिबिर संपन्न
देऊळगाव राजा : (प्रतिनिधी)
विद्याथीर्जीवनात अभ्यासासह इतर उपक्रमात सहभाग नोंदवल्यास सर्वांगीण विकास साध्य करता येतो. प्रत्येक महाविद्यालयातील रा.से.यो. हे व्यक्तिमत्व विकासाचे समृद्ध दालन असते. यामध्ये जो विद्यार्थी सहभाग घेतो तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो श्री व्यंकटेश महाविद्यालयाने अनेक नवोपक्रमाच्या माध्यमातून रा.से.यो. शिबिराचा आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन मा. आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांनी केले.
महाविद्यालयाच्या दत्तकग्राम पिंपळगाव (चि) येथे आयोजित रा.से.यो. विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप समारोह प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गजानन जाधव उपस्थित होते. याप्रसंगी अतिथी म्हणून दुसरबीड येथील नारायणराव नागरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नागरे, पत्रकार सुरज गुप्ता, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष दिपक बोरकर, तालुका शहर प्रमुख मोरेश्वर मिनासे, माजी नगराध्यक्ष गोविंद झोरे, सरपंचपती दीपक पवार यांच्यासह दत्तकग्राम पिंपळगाव (चि.) ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. दि. ०७ जानेवारी पासून सुरू असलेल्या रा.से.यो. शिबिराचा १३ जानेवारी, २०१९ रोजी समारोप झाला. स्वयंसेवकांना या शिबिरात आलेले अनुभव भावी आयुष्यात यशस्वी जीवन जगण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतील, अशी माहिती आमदार महोदयांनी दिली. महाविद्यालय प्रत्येक उपक्रम खूपच आत्मीयतेने आणि प्रामाणिकपणे राबवत असते असे गौरवोद्गारही त्यांनी याप्रसंगी काढले. अतिथी म्हणून उपस्थित प्राचार्य डॉ. विजय नागरे यांनी ग्रामीण भागात रा.से.यो. च्या माध्यमातून जी कामं केली जातात ती ग्रामविकासाचे द्योतक ठरतात तेव्हा स्वयंसेवकांनी स्वत:ला झोकून देऊन रा.से.यो. मधील उपक्रमात सहभाग नोंदवायला हवा असे आवाहन केले. याप्रसंगी सरपंचपती दिपक पवार, पत्रकार सुरज गुप्ता, संतोष जोशी यांच्यासह रा.से.यो. स्वयंसेवकांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष म्हणून उपस्थित प्राचार्य डॉ गजानन जाधव यांनी ग्रामीण भागाचा विकास हाच रा.से.यो. चा सेवाभाव असतो, असे प्रतिपादन केले. रा.से.यो. च्या माध्यमातून आम्ही ग्रामस्थांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी जे अनेकविध उपक्रम राबवतो त्यामागे समाजाला विधायक वळण देणा-या विचारांची पेरणी युवकांमध्ये करता यावी हा प्रामाणिक हेतू असतो, अशी माहिती प्राचार्य डॉ गजानन जाधव यांनी दिली. दत्तकग्राम पिंपळगाव (चि) येथे शिबिराच्या माध्यमातून सात दिवस विद्यार्थ्यांनी श्रमदान करून शोषखड्डे खोदले व ग्रामस्थांची सांडपाण्याची समस्या दूर केली, रस्ते नाल्यांची सफाई केली. हगणदारीमुक्त गाव, स्त्री-पुरूष समानता, स्वच्छ भारत अभियान आदी विषयांवर प्रभातफेरीच्या माध्यमातून तसेच घरोघरी जाऊन जनजागृती केली. विद्यार्थ्यांवर संस्कार व्हावे यासाठी विविध विषयावर विचारवंतांची व्याख्याने आयोजित करण्यात आली. सायंकालीन सत्रामध्ये गावक-यासाठी विविध प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले. रा.से.यो. शिबिर यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमअधिकारी प्रा. बाळासाहेब काळे, सहकार्यक्रम अधिकारी प्रा मधुकर जाधव, डॉ.रूपाली तेलगड, प्रा. गजानन खांडेभराड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी ग्रामस्थ, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व रा.से.यो. स्वयंसेवक उपस्थित होते.


No comments:
Post a Comment