Wednesday, January 16, 2019

बालाजी महाराजांची पुण्य नगरी होणार झगमगाट...नगराध्यक्षा सौ.शिंदे



एलईडी बसविण्याच्या कामाचा शुभारंभ  
देऊळगावराजा : (प्रतिनिधी)          
          महाराष्ट्रात राज्य ऊर्जा संवर्धन धोरण २०१७ राबविन्यास मंजूरी मिळाल्यानंतर राज्यासाठी स्वतंत्र ऊर्जा संवर्धन धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. पुढील पाच वर्षात विविध क्षेत्रात या धोरणाच्या माध्यमातून सुमारे ऊजेर्ची बचत करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून बालाजी महाराजांची पुण्य नगरी देखील चमकणार आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा सौ. सुनिता शिंदे यांनी केले. 
         स्थानिक आदर्श कॉलनी मध्ये दि.८ जानेवारी रोजी शहरात ऊर्जा बचतीसाठी सुुमारे एलईडी. पथदिवे बसवन्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. पुढे बोलतांना सौ.शिंदे म्हणाल्या की,  पुढील पाच वर्षात विविध क्षेत्रात या धोरणाच्या माध्यमातून उजेर्ची मोठी बचत केली जाणार आहे. भारत सरकारच्या उर्जा संवर्धन योजनेने या नव्या धोरणात वीज क्षेत्राशी संबंधित कार्यवाही, अर्थसाहाय्याच्या योजना, तरतूदी निश्चित करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्राची महाउर्जा ही संस्था केंद्रीय ऊर्जा संवर्धन कायदा, २००१ ची राज्य स्तरावर अंमलबजावनी करित आहे. या धोरणाची अंमलबजावणी देऊळगावराजा पालिकेने देखील केली आहे. या वेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिपक बोरकर, उपनगराध्यक्ष पवन झोरे, नगरसेविका सौ.शारदा जायभाये, नगरसेवक वसंतअप्पा खुळे, मातृतीर्थ ताुलका पत्रकार संघाच्या अध्यक्षा सुषमा राऊत, अर्जुन सिंग, अमरदेव रेड्डी ठेकेदार, प्रमिला वाघमारे, भारती डुरे, निर्माला वाघमारे, शोभा जाधव, कविता भाग्यवंत यांच्यासह असंख्य नागरिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment