देऊळगाव राजा : (प्रतिनिधी)
भारतीय जैन संघटनेचे सुजलाम सुफलाम बुलढाण्आा जिल्ह्यचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य सन्मती जैन यांची नुकतीच जायंट्स इंटरनॅशनल फेडरेशन २ इ च्या डायरेक्टर पदी निवड करण्यात आली असून जायंट्स ग्रुप चे माजी अध्यक्ष जुगलकिशोर हरकूट यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून त्यांना नुकतीच औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात त्याच्या पदाची जवाबदारी सोपवून त्यांना शपथ देण्यात आली, याच कार्यक्रमात जायन्ट्स इंटरनॅशनल फेडरेशन 2इ च्या अध्यक्ष पदी औरंगाबाद येथील उद्योजक अशोक थोरात यांची निवड करण्यात आलेली आहे.
जायंट्स इंटरनॅशनल ही आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी सेवा भावी संस्था असून या संस्थेची स्थापना भारतात होऊन याचे कार्य विदेशात सुद्धा फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुंबईचे माजी शेरीफ स्व.नाना चुडासामा यांनी ही सेवा भावी संस्था वाढविण्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे, या संस्थेच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत, फेडरेशन २ इ ची सण २०१९ ची कार्यकारिणी नुकतीच औरंगाबाद येथे जाहीर करण्यात आली, यामध्ये युनिट ३ च्या डायरेक्टर पदी देऊळगावराजा येथील भारतीय जैन संघटनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य सन्मती जैन यांचे सह ७ डायरेक्टर व १८ युनिट आॅफिसर ची निवड करण्यात आलेली आहे फेडरेशन २इ मध्ये ४० ग्रुप चा समावेश असून या ग्रुप चे ६०० सदस्य जायंट्स इंटरनॅशनल करिता काम करीत आहेत, या वर्षी नवीन १५ ग्रुप सुरू करण्याचा संकल्प नवीन कार्यकारिणी मंडळाने केला आहे, अवयव दान मध्ये या वर्षी फार मोठे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मरणोत्तर नेत्रदान चळवळ मध्ये सर्वच ग्रुपचे सदस्य काम करणार आहेत, सर्व नवनियुक्त पदाधिकाºयांचा यावेळी शपथ विधी पार पडल्यानंतर त्यांचे उपस्थितांनी स्वागत केले,



No comments:
Post a Comment