भक्तिभावात पार पडला जन्मोत्सव सोहळा
देऊळगाव राजा : (प्रतिनिधी)
संतांची भूमि असलेल्या महाराष्ट्रातील मेहुणाराजा ही संत चोखामेळा यांच्या पदस्पशार्ने पुनीत झालेली एक पावनभूमी आहे. त्यांच्या जन्मस्थळाला एका मोठ्या तीर्थस्थळाचा दर्जा देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करेल, अशी ग्वाही आ.डॉ. शशीकांत खेडेकर यांनी दि.१४ जानेवारी रोजी मेहुणाराजा येथे दिली.
संत चोखामेळा यांचा जन्मोत्सव दि.१४ जानेवारी सोमवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प. उपाध्यक्षा मंगलाताई रायपुरे होत्या. तसेच माजी आमदार तोताराम कायंदे, प्रा.कमलेश खिल्लारे, जि.प.सदस्या शीला शिंपणे, मनोज कायंदे, उपसभापती हरिभाऊ शेटे, डॉ. गणेश मांटे, उषाताई खेडेकर, प्रवीण गीते, विनोद ठाकरे, रंजनाताई चित्ते, दादाराव खार्डे, भगवान खंदारे, रियाजखॉं पठाण, व.द.वानखेडे, राजेंद्र चित्ते, बाबुराव नागरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सकाळी साडेसात वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक काढण्यात आली. टाळ, मृदंगाचा गजरात निघालेल्या पालखी सोहळ्यात लेझीम पथक, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या मुलींसह भाविक सहभागी झाले होते. पालखी मिरवणुकीनंतर मुख्य कार्यक्रम पार पडला. चोखामेळा जन्मोत्सव लोकोत्सव होण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन करत आ. खेडेकर म्हणाले, जन्मस्थळाच्या विकासासाठी चार कोटींचा कृति आराखडा तयार केला असून तो लवकरच मंजूर होईल. पहिल्या टप्प्यातील ५० लाखांचा निधी जमा झाला असून कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. आठ ते दहा दिवसांत पुन्हा ५० लाखांचा निधी प्राप्त होईल, असे त्यांनी सांगितले. संतांनी जातीभेद मोडीत काढून सर्वधर्म समभावाची शिकवण दिल्याचे तोताराम कायंदे यांनी सांगितले. प्रा. कमलेश खिल्लारे, मंगलाताई रायपुरे व प्रा. अण्णासाहेब पूजारी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन केंद्रप्रमुख बी.डब्ल्यू. कुमठे यांनी केले. आभार धनश्रीराम शिंपणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत प्रशासन व मराठी पूर्व माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले.
माजी मंत्री डॉ.शिंगणे चोखामेळा यांना अभिवादन करण्यासाठी आले अन गेले
संत चोखामेळा यांच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम सुरु असताना माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे हे संत चोखामेळा यांना अभिवादन करण्यासाठी आले असता मंचकावरील काही साहेब भक्तांनी धाव घेतली परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यात आहे. आणि चोखामेळा उत्सव पत्रिकेत नाव सुद्धा परंतु मंचकावर येण्याची व तमाम चोखामेळा भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी थोडी देखील औपचारिक्ता साहेंबानी दखवली नाही अशी कुजबुज सुरु झाली.




No comments:
Post a Comment