Monday, February 11, 2019

नरहरीनाथ पुण्यतीथी सोहल्याचे ध्वजारोहण


 
देऊळगांवराजा :  (प्रतिनिधी)
        येथील संत नरहरिनाथ महाराज मठाचा २२५ व्या पुण्यतिथी सोहळ्याचा ध्वजारोहण व मंडपपूजन समारंभ प.पू.मोहननाथ महाराज पैठणकर, ना.अर्जुनराव खोतकर (राज्य मंत्री), आ.डॉ.शशिकांतजी खेडेकर यांच्या शुभहस्ते व नगराधक्षा सौ.सुनिताताई शिंदे व ईतर मान्यवरांच्या उपस्थितित भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी अर्जुनरावजी खोतकर यांनी आपले मनोगत व्यक्त करित महोत्सवाला आपल्या शुभेच्छा दिल्या.
         या समारंभास बाजार समितीचे माजी सभापती तुकाराम खांडेभराड, डॉ.रामदास शिंदे, डॉ.रामप्रसाद शेळके, संतोष खांडेभराड, पल्लवी मल्हार वाजपे, डॉ.शंकर तलबे, रमेश कायंदे, मोरेश्वर मिनासे, सुनीताताई सानप,  धन्नावत, रंगनाथ कोल्हे, पत्रकार संघ अध्यक्ष सुषमा राऊत, शिवाजी वाघ , राजेश खांडेभराड, विलास जगताब  निलेश गिते तसेच देऊळगावराजातील सर्व प्रतिष्ठीत मान्यवर तथा समस्त भक्त परिवाराची उपस्थिती होती. देऊळगावराजामधे होणाºया या भव्य दिव्य ऐतिहासिक महोत्सवाचा सर्व ग्रामस्थांनी तसेच पंचक्रोशीतील भावीकांनी हजारोंच्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन ह.भ.प.उदबोध महाराज पैठणकर यांनी केले. 

No comments:

Post a Comment