Monday, February 11, 2019

बुलढाणा जिल्यातून जाणार हजारो कार्यकर्ते: सुनिल मतकर



     
मुंबई येथे २४ फेब्रुवारी रोजी भव्य मेळावा
  देऊळगांवमही :  (प्रतिनिधी)
       धनगर आरक्षणासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मुंबई येथे २४ फेब्रुवारी रोजी भव्य मेळावा घेण्यात येणार असून या मेळाव्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातुन।  मोठ्या संख्येने राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते  जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख सुनील मतकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
            धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात आणि देशात मोठी चळवळ राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष ना महादेव जानकर यांनी केली यापूर्वी सत्तेवर असणारे पक्षांनी धनगर समाजाच्या आरक्षणकडे काना डोळा केला धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ना महादेव जानकर यांनी राज्यात रान उठवलं याच संधिचा फायदा घेत भाजपने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिलं मात्र प्रत्यक्षात आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही यासाठी भाजप सरकारला जाब विचारण्यासाठी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला जिल्ह्यातुन प्रदेश उपाध्यक्ष सुभाष राजपूत, अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती सुनील मतकर यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment