Monday, February 11, 2019

शिवसंग्रामचा शेतकरी पेंशन योजनेसाठी सि.राजात मेळावा



 तालुक्यातून जाणार हजारो शेतकरी- राजेश इंगळे

देऊळगांव राजा : प्रतिनिधी
   शेतकरी व शेतमजुरांना प्रति महिना तीन हजार रुपये पेंशन लागु करण्यासाठी तसेच सुशिक्षित बेरोजगार युवकांना हक्काचे काम मिळण्यासाठी व इतर मागण्यासाठी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने आ.विनायकराव मेटे यांच्या नेतृत्वात १५ फेब्रुवारी रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे भव्य मेळावा घेण्यात येणार असून या मेळाव्यासाठी बुलढाणा जिल्ह्यासह देऊळगांव राजा तालुक्यातून मोठ्या संख्यने शेतकरी,सुशिक्षित बेरोजगार तरुण व शिवसंग्रामचे कार्यकर्ते हजर राहणार असल्याची माहिती शिवसंग्राम संघटनेचे देऊळगांव राजा तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
        मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात मोठी चळवळ शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ.विनायकराव मेटे यांनी सुरू करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले.व प्रत्येक्षात मराठा आरक्षणाची अमलबजावणी देखील झाली.याचबरोबर  अरबी समुद्रातील छ्त्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारकाच्या कामाचे जल पूजन होऊन प्रत्येक्ष कामास सुरवात झाली आहे.शेतकरी-शेतमजुरांना दरमहा तीन हजार रुपये शासनाने पेन्शन लागू करावी,बुलढाणा जिल्ह्याचे नामकरण राजमाता जिजाऊ नगर करावे,सुशिक्षित बेरोजगार युवकांना नौकरी द्या अन्यथा दरमहा पाच हजार रुपये भत्ता द्या,व इतर मागण्यासाठी आ.विनायकराव मेटे यांच्या नेतृत्वात व तानाजी शिंदे प्रदेश अध्यक्ष शिवसंग्राम, दीपाली सय्यद-भोसले महिला प्रदेश अध्यक्षा यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंदखेडराजा येथे मेळावा आयोजित केला असून या मेळाव्याला जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष संदीप गायकवाड,पंजाबराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो शेतकरी,बेरोजगार तरुण व शिवसंग्रामचे कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती राजेश इंगळे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment