देऊळगांवराजा : (प्रतिनिधी)
श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीतील नगर पालिकेच्या नविन सुज्ज इमरातीच्या लोकर्पण सोहळा आज दि.१४ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
देऊळगावराजा शहरात चिखली रोड वरील नगर पालिकेच्या नविन इमरतीचे बांधकाम करण्यात आले होते. त्याचे लोकर्पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे हस्ते व्हावा यासाठी नगराध्यक्षा सौ.सुनिता शिंदे यांनी वारंवार प्रयत्न केले. अखेर त्यांच्या प्रयत्नां यश प्राप्त झाल्याने आज दि.१४ फेबू्रवारी रोजी श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीतील नगर पालिकेच्या नविन सुज्ज इमरातीच्या लोकर्पण सोहळा मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.याप्रसंगी जिल्हयातील तसेच मातृतीर्थ मतदार संघातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.





No comments:
Post a Comment