Wednesday, February 13, 2019

उदयोन्मुख महिला नगराध्यक्षाने साधला बालाजी नगरीचा विकास



विकास कामांसाठी शहरात आणला कोट्यावधींची निधी
माझा एकच ध्यास...सर्वांच्या सोबत शहराचा सर्वांगीण विकास
 देऊळगांवराजा : अशरफ पटेल
         राज्य शासनाच्या निर्णयानूसार थेट जनतेतून नगरराध्यक्षपदाची निवड    शहरातील सुप्रसिध्द डॉक्टर रामदास शिंदे यांच्या पत्नी सौ.सुनिता रामदास शिंदे यांना भारतीय जनता पार्टीने आणि शिवसेना युतीने जनतेतुन नगरध्यक्षपदासाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरविले आहे. डॉ.रामदास शिंदे यांचा राजकीय अनुभव आणि अहोरात्र रुग्णाची सेवा तसेच सौ.सुनिता शिंदे ह्या माजी  नगरसेविका, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका व  कृषी उत्पन बाजार समितीत संचालिका पदावर कार्यरत होत्या. या अनुभवावर सौ.सुनिता शिंदे थेट जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी निवडणूकीत आपले भाग्य अजमविण्यासाठी उतरल्या गेल्या देउळगांवराजा शहराच्या नगराध्यक्ष पदासाठी त्या योग्य उमेदवार होत्या. आणि त्यांनी आपल्या निकवर्ती सौ.दराडे यांचा परभाव करुन विजयी प्राप्त करुन श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीतील उदयोन्मुख महिला नगराध्यक्षा सौ.सुनिता शिंदे यांनी साधला बालाजी नगरीचा विकास तसेच विकास कामांसाठी शहरात आणला कोट्यावधींची निधी, त्यांचे एकच म्हण... माझा एकच ध्यास...सर्वांच्या सोबत शहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय मनात ठेवून नविन विकासाची संकल्पना घेवून नगर पालिकेच्या सुसज्ज इमरातीचे लोकर्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते आज होणार आहे. याप्रसंगी भाजप आणि शिवसेनेचे मान्यवर उपस्थितीती लाभणार आहे.

           बुडती हे जन न देखे डोळा म्हणूनी कळवळा येत से... ह्या तुकाराम महाराजांच्या विचाराने चालणारा माझा परिवार आहे प्रामुखयाने माझे पती डॉ. रामदास शिंदे  परिवाराची  मी सुन आहे. या परिवारातील प्रत्येक मानुस हा देवमानुस आहे . त्यांच्या सहवासात मला जनसामान्यांच्या समस्या कोणत्या  आहेत त्या मी जवळून पाहीलेल्या आहे . डॉ.शिंदे साहेबांनी व मी सामाजीक  व राजकीय कार्याची आवड व लोकांच्या समस्यांची जान असल्याने मी भाजपाच्या माध्यमातुन समाज उपयोगी कामे केलेली आहेत.  नगर पालिकाच्या अधिकाराशिवाय अनेक कामे करणे अशक्य होते. लोकांना मुलभूत सुविधा मिळत नाही. परंतु कर मात्र जास्त प्रमाणात घेतल्या जातो. हे सगळे डोळ्यासमोर होत असतांना महिला असूनही अस्वस्थ होते. पण प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवणारा कोण? माझा स्वभाव मुळाताच जनतेच्या समस्यांसाठी लढण्याचा व झुंजण्याचा आहे. जनतेचे दु:ख हेच माझे दु:ख आहे. हे समजून मी स्वत: होईल तितके काम करण्याचे प्रयत्न केले.  सर्व योजना नगर पालिकेतील नागरिकांपर्यंत पोहचवयाचे आहेत. सर्व समाज हा गुण्यागोविंदाने नांदावा त्यांना शिक्षण व आरोग्य चांगल्या पद्धतीने लाभावे आणि देशातविकासाचे वारे सुरू असतांना माझे सुद्धा शहराचा विकास चांगल्या पद्धतीने व्हावा. एक महिला शहराचा विकास किती समर्थपणे करू शकते हे दाखविण्यासाठी आणि अनेक तरूण, जेष्ठ महीला पुरूष  मार्गदर्शकांनी मी निवडणूक लढवावी अशी गळ घातली. माझ्या शहरवासीयांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे की मी शहरासाठी काय करू शकते.  शहरामध्ये नाल्या, बंद पडलेले पथदिवे, सार्वजानीक प्रसाधन गृहे आणि नागरिकांचे आरोग्य या प्रमुख समस्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याचप्रमाणे माझ्या शहरातील लहान मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी नगर पालिकेच्या शाळा डिजिटल करण्या करीता पाठपूरावा केला, तसेच नगर पालिकाच्या शाळांना सक्षम उच्च दर्जाचे शिक्षणासाठी प्रवृत्त करणार शहरातील अनेक नागरिक लघु व्यवसाय व मोलमजुरी करतात. त्यामुळे ते आपल्या पाल्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देवू शकत नाही. कचºयाची व्यवस्था करण्यात आली, स्वच्छता ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आली, तरूणांसाठी शहरात अत्यधुनिक जिमची स्थापना करण्यात आली, शहरात उद्यानामध्ये काही कमतरता होती तीे पूर्ण करण्यात आली आहे. अनेक गोरगरीबांच्या घरकूलांचा प्रश्न मार्गी लावेल शहराच्या नगर पालिकाच्या प्रत्येक शाळांना अत्याधूनिक तंत्र बसून डिजिटल केले, आमना नदीचे खोलीकरण जनसहभागतून मा.आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या देखरेखीखाली पूर्णत्वास, पिचींग काम, घाटपायºया, रेलींगचे काम लवकरच सुरू करणार, फुटपाथ मार्ग, दुतर्फा एलएडी लााईट, शहरात काही ठिकाणी हायमास्क लाईटची उभारणी, नौका विहार, पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था व सुुलभ शौचालय, चौक सौंदर्य करणे, सर्व चौकाची पूर्णपणे कायापलट करणार न.पच्या जागेवर अद्यावत ग्रंथालयची उभारणी होणार, महिलांना व्यायामासाठी लेडिज जिमची उभारणी,  पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था शौचालय, असे विविध विकास कामास सुरुवात करण्यात आली व शहराला र्स्माट सिटी बनविण्या करीता हेच माझे ध्येय आहे.  

  

              

No comments:

Post a Comment