Wednesday, February 13, 2019

खड्डेमय रस्ते व पाण्यापासून त्रस्त ग्रामस्थानी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी

 
 मागण्या पूर्ण न झाल्यास आत्मदहनाचा इशारा  
देऊळगांवराजा : (प्रतिनिधी)                                                                                         तालुक्यातील गिरोली बुद्रूक ते निमखेड रस्त्याची प्रचंड दुर्दशा व राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर न झाल्याने संतप्त नागरिकांनी या रस्त्याकडे व राष्ट्रीय पेयजल योजना मंजूरीकडे दुर्लक्ष करणाºया लोकप्रतिनिधी व प्रशासना विरोधात दि.१० फेब्रूवारी रोजी गिरोली फाट्यावर येवून प्रचंड घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केले. तर दि.१२ फेबू्रवारी रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून दि.२३ फेब्रूवारी रोजी आत्मदहनाचा इशारा दिला. 
        देऊळगावराजा शहराच्या अवघ्या ५ किमी असलेल्या गिरोली बुदु्रूक फाटा ते निमखेड पर्यंत दोन किमी. रस्त्याचे चार महिन्यापूर्वी डांबरीकरण झाले होते. मात्र काही दिवसांतच डांबर उखडून रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले. दुचाकी व चारचाकी वाहनांसह शाळकरी मुलांना सायकलीने जिवघेणा प्रवास करावा लागत आहे. तसेच मानव विकास योजने अंतर्गत मुलींसाठी सुरु असलेली बस सेवा ३ वर्षापासून रस्ता खराब झाल्याने बंद आहे. त्यामुळे ग्रमस्थांनी नहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच गटग्रमपंचायत गिरोली बु. व निमखेड या दोन्ही गावामध्ये १५ वर्षापासून नळ योजना बंद पडलेली आहे. गावकºयांना पाण्यासाठी वनवन भटकांती करावे लागत आहे. त्वरीत राष्ट्रीय पेयजल योजना मंजुर करुन दोन्ही गावाला पाणी पुरवठा सुरु करुन देण्यात यावा अन्यथा दि.२३ फेबू्रवारी रोजी आत्मदहनाच्या इशारा देण्यात आला आहे. तसेच येणाºया लोकसभा व विधानसभा निवडणुकी तमतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा ही देण्यात आला आहे. या निवेदनावर लक्ष्मण कव्हळे, हर्षवर्धन देशमुख, परमेश्वर कव्हळे, संजय जाधव, संतोष जाधव, हरीचंद्र झोरे, बाबासाहेब झिने, विकास कव्हळे, नामदेच मगर, हरीभाऊ सोनूसे, गौतम झिने, शिवाजी चव्हाण, विठ्ठल झिने, रामदास पिटकर, पाडुरंग सानप, एकनाथ कव्हळे, माणिक झिने, ज्ञानेश्वर शिंदे, काकासाहेब कव्हळे, प्रल्हाद देशमुख आदी गवकºयांच्या स्वक्षºया आहे.    

No comments:

Post a Comment