देऊळगांवराजा : (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील मुली शिक्षणा पासून वंचित राहु नाही म्हणून त्याच बरोबर शैक्षणिक क्षेत्रात मुलींचे प्रमाण वाढले पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेऊन मानव विकास योजेने अंतर्गत आदर्श गाव पिंपळगाव चिलमखॉ येथे जि.प.उच्च प्राथमिक शाळा मध्ये दि.१२ फेब्रूवारी रोजी ग्रामीण भागातुन शिक्षण घेण्यासाठी पाच कि.मी अंतरावरुण प्रवास करणाºया ८ वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्याथिंर्ना सायकलचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पुष्पहार,अर्पण करुण पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षण अधिकारी दादाराव मुसदवाले होते तर प्रमुख पाहुणे सरपंचपती दिपक पवार, शा.व्य.समिती अध्यक्ष कृष्णा निकाळजे, रुपचंद डोंगरे, दमोता खांडेभराड, परमेश्वर खांडेभराड, प्रल्हाद पाटोळे, गजानन तळेकर, श्रीकृष्ण भटकर, ग्रामविकास अधिकारी बाळकृष्ण तिडके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी आदर्श गाव पिंपळगाव चिलमखॉ येथे जि.प.उच्च प्राथमिक शाळेच्या वर्ग ८ वी च्या मुलींना एकाच वेळी दजेर्दार अशा सायकल ताब्यात देण्यात आल्यामुळे त्यांच्या चेहºयावर मोठा आनंद दिसून आला. या प्रसंगी कार्यकमाचे अध्यक्ष मुसदवाले, कृष्णा निकाळजे, दिपक पवार यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, आजच्या शिक्षण क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाल्या असून विद्यार्थ्यांनी शिक्षणाला प्रथम प्राधान्य देऊन आयुष्यातील महत्वपूर्ण यश हे शिक्षणच आहे. यासाठी आभ्यासात सातात्य ठेऊन कठोर परीश्रम घेऊन यशस्वी वाटचाल करावी असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापक यांनी केले तर शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला विद्यार्थ्यासह पालक वगार्ची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.


No comments:
Post a Comment