शिवसंग्रामचा मेळावा रद्द करून शहिदांना श्रद्धांजली
देऊळगांव राजा : प्रतिनिधी
मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे शुक्रवार, १५ फेब्रुवारी रोजी शिवसंग्राम संघटनेच्या शेतकरी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मात्र १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामुळे हा मेळावा रद्द करून हल्ल्यात शाहिद झालेल्या जवानांना शिवसंग्रामच्या वतीने आ.विनायकराव मेटे यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव मेटे म्हणाले की,आपल्या देशावर फार मोठे संकट कोसळले आहे.दहशतवादी भ्याड हल्ल्यात आपल्या देशाचे ४० वीर जवान शहीद झाल्याने देशावर शोककळा पसरली आहे.सर्व पक्षांनी एकत्र येऊन या भ्याड हल्ल्याच्या विरोधात मोहीम उघडली पाहिजे.छोटे-मोठे हल्ले न करता भारताने पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांचा खात्मा करावा,यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भ्याड हल्ल्याच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला पाहिजे,हीच शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल.या हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे देखील दोन जवान शहीद झाले आहे.असे प्रतिपादन विनायकराव मेटे यांनी केले. यावेळी जिजामाता राजवाड्यासमोर शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या कार्यक्रमाला शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेत पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ.विनायकराव मेटे यांच्या बरोबर शिवसंग्रामचे प्रदेश अध्यक्ष तानाजी शिंदे,युवक प्रदेश उपाध्यक्ष जगन्नाथ काकडे,प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील,विध्यार्थी आघाडी प्रदेश अध्यक्ष अविनाश खापे,औरंगाबाद जिल्हाध्यक्ष किशोर चव्हाण,सचिन मिसाळ,बीड जिल्हाध्यक्ष तुळशीराम पवार,गणेश बुजगुडे, जालना युवक अध्यक्ष निलेश गोर्डे, जिल्हाउपाध्यक्ष नारायण टकले, बुलढाणा जिल्हाध्यक्ष संदीप गायकवाड,पंजाबराव देशमुख, जिल्हा सरचिटणीस नितेश थिगले, अजय बिल्लारी, महिला जिल्हाध्यक्ष वंदना निकम, अशोक जाधव, देऊळगांव राजा तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, लोणार तालुकाध्यक्ष गणेश मापारी, चिखली तालुकाध्यक्ष विजय पाटील, संतोष जाधव, तालुका संघटक जहीर पठाण, आयाज पठाण,विनोद खार्डे,गजानन खार्डे,अजमत पठाण, संतोष हिवाळे, सुरेश निकाळजे, आरिफ पठाण, मदन डुरे यांच्यासह बुलढाणा जिल्हातील शिवसंग्राम संघटनेचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते हजर होते.



No comments:
Post a Comment