राष्ट्रवादी अल्पसंख्यक विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
देऊळगांवराजा : प्रतिनिधी
काशमीर मधील पुलवामा जिल्हायात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या एका वाहन ताफ्यावर दहशतवाद्यांनी स्फोटकांनी केलेल्या भ्याड हल्लायात ४० हून अधिक जवान शहिद झाले त्यांनी देशासाठी दिलेला बलिदान व्यर्थ जाणार नाही. असे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार अॅड.माजीद मेमन यांनी केले.
लोकसभा निवडणुकी संदर्भात राज्यसभा खासदार अॅड.माजीद मेमन बुलडाणा जिल्हयाच्या दौºयावर आले होते. दि.१९ फेबू्रवारी रोजी स्थानिक कोटकर निवास येथे राष्ट्रवादी अल्पसंख्यक विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड.नाझेर काझी होते. तर प्रमुख पाहूने म्हणून जिल्हा परिषद सदस्य रियाजखॉ पठाण, अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणिस इरफान अली, राष्ट्रवादी नेते हाजी आलम खान कोटकर, विधासभा अध्यक्ष गजानन पवार, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मोबिन अहेमद, महेश देशमुख आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना अॅड.मेमन म्हणाले की, येणाºया लोकसभा आणि विधासभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार यांना साथ द्या. राष्ट्रवादीचे प्रत्येक उमेदवारांना निवडून आणा आज रोजी अल्पसंख्यांक समाजाच्या अनेक समस्या समोर उभे आहे. त्यापूर्ण करण्यासाठी मी तुम्चया समोर आला आहे. याप्रसंगी इरफान अली आणि अॅड.काझी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शारीक सर यांनी केले तर आभार काशीफ खान कोटकर यांनी मानले. या कार्यक्रमात शहरातील अल्पसंख्याक समाजातील युवकांनी राष्ट्रवादी पक्षात जाहिर प्रवेश केला. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अल्पसख्यांक जिल्हा सरचिटणिस शेख फारुक, शहराध्यक्ष अहेमद खान यांनी परीश्रम घेतले. यावेळी नगरसेवक विष्णू रामाणे, माजी नगरसेवक तरेश रुपारेलीया, मनोज कारीया, हाजी इनायत खान कोटकर, रफीक नाना, फेरोज खान, वसीम शाह, असलम शाह, इम्राण शाह, मोहसीन शाह, तौसीफ शाह तसेच धाड, दुसरबीड, मेहकर येथील नागरिक उपस्थित होते.



No comments:
Post a Comment